Dhule Crime News : दगडांसह गोफण, गिलोरचा सर्रास वापर; कॉपर केबल चोरीच्या उद्योगाने साक्रीही बदनाम

Dhule Crime ‘नासा’ या अवकाश संशोधन करणाऱ्या जगविख्यात संस्थेच्या अध्ययनानंतर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या सोलर सिटी प्रकल्पासाठी शिवाजीनगर (ता. साक्री) भागाची निवड करण्यात आली.
A CCTV footage of gang criminals.
A CCTV footage of gang criminals.esakal

Dhule Crime News : ‘नासा’ या अवकाश संशोधन करणाऱ्या जगविख्यात संस्थेच्या अध्ययनानंतर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या सोलर सिटी प्रकल्पासाठी शिवाजीनगर (ता. साक्री) भागाची निवड करण्यात आली. जोडीला निजामपूर माळमाथा (ता. साक्री) परिसरात सुझलॉन पवनऊर्जा प्रकल्प आहे. या माध्यमातून आणखी विकासाच्या चार गोष्टी जिल्ह्याच्या पदरात पाडून घेणे तर दूरच, उलट प्रकल्पस्थळी चोऱ्यामाऱ्या करून साक्री तालुक्यासह जिल्ह्याला बदनामीचा कलंक लावण्यात धन्यता मानली जात आहे. ( Sakri is also famous for its copper cable theft industry )

त्यासाठी दगडांसह गोफण, गिलोरचा वापर करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या पोलिसांचा कुठलाही अंकुश नसल्याने मोकाट आहेत. सोलर सिटी आणि सुझलॉन पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल (तांब्याची तार) या गुन्हेगारी टोळ्यांनी लक्ष्य केल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. कॉपर केबलची चोरी करून नंतर भंगारात विक्रीचा उद्योग या टोळ्यांनी विस्तारला आहे. तांब्याच्या तारा विक्रीतून चांगला पैसा मिळत असल्याने टोळ्यांची संख्या वाढू लागली आहे.

सुरक्षारक्षकांची नियुक्ती

सोलर व पवनऊर्जानिर्मिती कंपन्यांनी प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी नऊ ते दहा सुरक्षारक्षक संस्थांशी करार केला आहे. त्यानुसार दोन्ही प्रकल्पांसाठी दिवसा व रात्रपाळीचे मिळून सरासरी ५०० ते ६०० सुरक्षारक्षक तैनात आहेत. सुझलॉन कंपनीचे टॉवर एकमेकांपासून लांब असल्याने सुरक्षारक्षकांना वाहने देण्यात आली आहेत. सोलर सिटी प्रकल्पासाठी वेगवेगळ्या टापूत सुरक्षारक्षकांची नेमणूक आहे. दोन्ही प्रकल्प विस्तीर्ण जागेत असल्याने नेमलेल्या भागात सुरक्षारक्षक गस्त घालत असतात. (latest marathi news)

A CCTV footage of gang criminals.
Dhule Crime News : सारंगखेडा आठवडे बाजारात चोरांचा धुमाकूळ! नागरीकांमध्ये दहशत; पोलिसांसमोर आव्हान

दोन प्रकारे चोऱ्या

शिवाजीनगर भागातील सोलर सिटी प्रकल्प खडकाळ जागेवर असल्याने कॉपर केबल या जमिनीवर किंवा ‘ट्रे’मध्ये असतात. सुझलॉन पवनऊर्जा कंपनीचे टॉवर आहेत. त्या टॉवरमध्ये कॉपर केबल असतात. टोळ्यांकडून अंधाराचा फायदा घेत सोलर प्रकल्पस्थळी कटरने अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत कॉपर केबल कट केली जाते. सुझलॉनच्या टॉवरमधील कॉपर केबल काढण्यासाठी वेल्डिंग कटरचा वापर केला जातो.

अशा कॉपर केबलची चोरी करण्यासाठी टोळ्या लपून किंवा दगडफेक, गोफण, गिलोरद्वारे हल्ला करतात. या दोन प्रकारे चोऱ्या करताना गुन्हेगार लपतछपत प्रकल्पस्थळी येतात. ज्या भागात सुरक्षारक्षक नाही त्या भागात कटरने कॉपर केबल कट करून पळ काढतात. काही गुन्हेगार तुफान दगडफेक, गोफण, गिलोरद्वारे हल्ला चढवून सुरक्षारक्षकांना पळवून लावतात व केबल चोरून नेतात.

गुन्हेगारांची शक्कल

प्रकल्पस्थळी सरासरी १२ ते २५ च्या संख्येने गुन्हेगार येतात. त्यातील सात ते आठ गुन्हेगार तुफान दगडफेकीतून सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवतील आणि उर्वरित गुन्हेगारांनी विरुद्ध दिशेला सोयीच्या भागातून कॉपर केबल कट करून पसार व्हायचे, अशी शक्कल टोळ्यांकडून लढविली जाते.

A CCTV footage of gang criminals.
Dhule Crime News : घरफोडीप्रकरणी दोघांना अटक; संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत

सुरक्षारक्षक नेमके कुठे आहेत, कुठल्या भागात नाहीत याची रेकी करून लपून किंवा थेट तुफान हल्ला चढवून कॉपर केबलची चोरी केली जाते. हल्ल्यात पवनऊर्जेच्या टॉवरचे म्हणजेच पंख्याचे, सोलर प्रकल्पातील प्लेट्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. ही गंभीर बाब साक्री तालुक्याला ठाऊक असताना निमाजपूर पोलिस ठाण्याला माहीत नसावी का?

प्रकल्प परिसरात दहशतीचे वातावरण

दोन्ही प्रकल्पस्थळी टोळ्यांमधील गुन्हेगार १२, १५, २० ते २५ च्या संख्येने येतात. तेथे नुकत्याच झालेल्या काही घटनांमध्ये गुन्हेगारांनी तुफान दगडफेक करीत तांब्याची कॉपर केबल चोरून नेली. सोलर प्लेट्‌स फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. सुरक्षारक्षकांच्या गस्तीच्या वाहनांचे दगडफेकीतून नुकसान केले.

दरोड्यानुरूप प्रकारातून गुन्हेगारी टोळ्या दहशत निर्माण करीत आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. परिणामी, शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येत आहे. याबाबत अनेक गुन्हे दाखल असूनही आरोपी मोकाट कसे, असा गंभीर प्रश्‍न साक्री तालुक्यातून उपस्थित केला जात आहे.

A CCTV footage of gang criminals.
Dhule Crime News : पोलिसांवर हल्ला प्रकरणी जमावावर गुन्हा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com