.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
धुळे : जामदा (ता. साक्री) येथे भंगारचा माल घेण्यासाठी आलेल्या सुरतच्या तीन व्यापाऱ्यांना लुटण्यात आले. त्यांना जंगलात नेऊन हात-पाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडील रोकडसह सोने, असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल हिसकावून नेला. ही घटना मंगळवारी (ता. १३) सायंकाळनंतर उजेडात आली. या प्रकरणी संशयित १४ जणांवर निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित दोघांना ताब्यात घेतले. (Surat traders robbed in forest)