Pik Vima Yojna
sakal
धुळे: शेतकऱ्यांसाठी संरक्षणात्मक कवच ठरणाऱ्या पीकविम्याला यंदा जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यातील सुमारे पावणेतीन लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ ८४ हजार १७५ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. यातून ७५ हजार ९४ हेक्टर क्षेत्राचेच संरक्षण झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल तीनपट घटले आहे.