Akshaya Tritiya 2024 : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात आंब्यांचा मोहोर

Akshaya Tritiya : साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षयतृतीया सणानिमित्त शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.
Mangoes entered the city market.
Mangoes entered the city market.esakal

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षयतृतीया सणानिमित्त शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षयतृतीयेची महिलावर्गामध्ये लगबग सुरू झाली होती. यासाठी लागणारी घागर, आंबे, टरबूज व इतर पूजेच्या साहित्याची दुकाने शहरात लागली. या दुकानांवर दोन दिवसांपासून महिलावर्गाची खरेदीसाठी गर्दी दिसली. (dhule demand of mangoes in market on occasion of Akshaya Tritiya )

अक्षयतृतीयेला मोठे महत्त्व आहे. या मुहूर्तावर शहरात विविध नवीन गृहोपयोगी वस्तू, वाहने, सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी होत आहे. मातीची घागर, लहान मडके यांची विक्री शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत होत आहे, तर आंब्याचा दर वधारला आहे. बदाम, लालबाग आंबा शंभर ते दीडशे रुपये, त्या खालोखाल पायरी, लंगडा आदी प्रकारचे आंबे सत्तर ते शंभर रुपये दराने विक्री होत आहेत. देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी ६५० ते ७०० रूपयांपर्यंत उपलब्ध आहे.

परप्रांतातून आंबे दाखल

अक्षयतृतीयेनिमित्त बाजारात आठवडाभरापासून गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आंबे विक्रीला दाखल झाले आहेत. स्थानिक तसेच कोकण वा परराज्यातील आंब्यावर यंदाची अक्षयतृतीया गोड होणार आहे. या सणाला फळांच्या राजाचे पुरेसे आगमन होणार असल्याने तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहील, असे चित्र आहे.

परराज्यातून मोठी मागणी

आंब्याच्या रसाचा नैवेद्य (आगारी) पूर्वजांना दाखवून हा सण साजरा केला जातो, म्हणून या सणाला आमरस करून सण गोड करण्याकडे कल राहतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षयतृतीया सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुरणपोळीचे सुग्रास जेवण हा त्यातील एक महत्वाचा भाग असतो. (latest marathi news)

Mangoes entered the city market.
Akshaya Tritiya 2024: सोन्याच्या बाजारपेठेला झळाळी; अक्षय्य तृतीयेनिमित्त मोठी उलाढाल, सराफ व्यावसायिकांना विश्वास

आमरसाच्या पंगतींना खर्‍या अर्थाने या सणापासूनच सुरवात होते. मात्र, दरवर्षी बाजारात पुरेसा आंबा येतोच असे नाही. यावर्षी बदाम, लालबाग, केडर, हापूस, पायरी या व अन्य प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. कोकण, कर्नाटक व इतर राज्यातून येणाऱ्या या आंब्यांना मोठी मागणी आहे.

दर आणखी उतरणार

जिल्ह्यात गावरानी व आंब्यांची झाडे मोठ्या अल्पप्रमाणात आहेत. काही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या जातीची आंब्यांची झाडे लावून आमराया वाढवल्या आहेत. या कैऱ्या परिपक्व होऊ लागल्याने तोही आंबा बाजारात दाखल होऊ लागला आहे. यावर्षी काही आंब्यांना चांगला मोहोर आला. तर काहींना मोहोरच आला नाही. तापमानात एकदम वाढ झाल्याने लहान आकाराची फळे गळून पडली, तर काही भागात बेमोसमी पावसाने दगा दिला.

यामुळे आंब्याच्या उत्पादनाला काहीअंशी फटका बसला आहे. अक्षयतृतीयेनिमित्त आंबा बाजारात येऊ लागला आहे. त्याचे दर किमान १०० पासून कमाल १२० ते १५० रुपये किलो आहेत. अक्षय्यतृतीयेपर्यंत हे भाव आणखी कमी होतील, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे.

मातीची घागर दाखल

आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी अक्षयतृतीयेला दोन मातीच्या कलशाची पूजा केली जाते. त्यानिमित्त बाजारात ठिकठिकाणी लाल मातीचे घागर व पूजेचे साहित्य दाखल झाले आहे. १०० ते १५० रुपयांपर्यंत मातीची घागर बाजारपेठेत विक्रीला आहे.

Mangoes entered the city market.
Akshaya Tritiya 2024 : पुण्यात यंदा ६ हजार नवीन वाहनांची खरेदी; दुचाकी सुसाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com