धुळे- खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिलेल्या १४३.९४ कोटींच्या पीककर्ज उद्दिष्टाच्या तुलनेत मेअखेरपर्यंत तब्बल १९१.३५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. हे प्रमाण उद्दिष्टाच्या १३३.९४ टक्के इतके आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यात एकूण ६७३.४८ टक्के उद्दिष्टांपैकी ८७.४४ कोटींचे पीककर्ज पाटप केले आहे. ही आकडेवारी जूनअखेरची आहे.