धुळे: प्रशासक राज असलेल्या येथील जिल्हा परिषदेत वरिष्ठ अधिकारी पातळीवर फाईल धूळखात पडू देण्याची गैरप्रथा निर्माण झाल्याने कर्मचारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य शासनाकडून निरनिराळ्या विभागांच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या लाभ योजनेच्या फाईल महिनोनमहिने का अडवून ठेवल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यात फाईलचा टेबलनिहाय प्रवास आणि त्या फाईल सर्वाधिक काळ कुठल्या अधिकाऱ्याच्या दालनात कुठल्या कारणासाठी धुळखात पडू देण्यात आल्या याची मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या मुख्य सचिवांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेतून होत आहे.