Dhule Summer Heat : वाढत्या उष्णतेचा शेतमजुरांच्या आरोग्यावर परिणाम?

Dhule News : ऊन, पाऊस, वाऱ्याची कसलीही तमा न बाळगता शेतमजूर महिलांचा संघर्ष थक्क करणारा आहे. यंदाच्या तीव्र उन्हाचे सर्वाधिक चटके महिला मजूर सोसत असल्याचे चित्र आहे.
Dhule Summer Heat
Dhule Summer Heat esakal

म्हसदी : महिलांना दैवानेच सर्जनशीलतेचे वरदान दिले आहे असे म्हटले जाते. कोणतेही काम महिला मन लावून करतात. ऊन, पाऊस, वाऱ्याची कसलीही तमा न बाळगता शेतमजूर महिलांचा संघर्ष थक्क करणारा आहे. यंदाच्या तीव्र उन्हाचे सर्वाधिक चटके महिला मजूर सोसत असल्याचे चित्र आहे. (Dhule Effect of increasing heat on the health of farm workers)

वाढत्या उष्णतेचा महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याचा साधा विचार कोणी करताना दिसत नाही. यंदा उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आरोग्य विभागाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेती व्यवसायाला श्रमजीवी मदत महिलांची हमखास लागते.

पारंपरिक शेतीसाठी महिला शेतकरी, महिला मजुरांचे योगदान नक्कीच आदर्श मानले जाते. आज सर्वत्र दुष्काळाची दाहकता वाढत आहे. पारंपरिक शेतीत सध्या कांदा काढणी सुरू आहे. तीव्र उन्हाच्या झळा महिला मजुरांना बसत असल्याचे वास्तव आहे. कारण महिला मजुरांना ऊन अंगावर घेत दिवसभर काम करावे लागत आहे. किंबहुना ते काम करण्याशिवाय गत्यंतरही नाही.

कांदा काढणीसाठी महिला मजुरांची मदत

विहिरींनी तळ गाठल्याने शेती व्यवसाय ठप्प झाल्याचे चित्र आहे. पाणीच नसल्याने बागायती शेती कोरडवाहू झाली आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदालागवड केली होती. जेमतेम पाण्यात कांदा पीक हाती आले आहे. सध्या कांदा काढला जात आहे. कांदालागवडीपासून निंदणी, काढणीपर्यंत महिला मजुरांच्या मदतीशिवाय पर्याय नाही. (latest marathi news)

Dhule Summer Heat
Dhule Lok Sabha Constituency : धुळ्यापुढे जळगावची रॅली फिकी!

उन्हाळ कांदा काढणीसाठी महिला मजुरांना जिवाचे रान करावे लागत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होणार आहे. जास्त तापमानामुळे अनेक आजार बळावू शकतात. वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर झाल्याचे चित्र आहे. एकीकडे दुष्काळी स्थितीमुळे शेतमजुरांच्या हाताला काम नसले तरी आहे ते काम ऐन उन्हात करावे लागत असल्याचे चित्र आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

स्थानिक ठिकाणी शेतमजुरांना रोजगाराची हमी योजनेच्या कामांची प्रतीक्षा करावी लागत आहे. असे असताना यंदाचे तीव्र तापमान, पाणी समस्येवर प्रशासन फारसे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे वाढत्या उन्हात काम केल्यावर उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे.

शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित केला जातो. त्याचा उपयोग किती होत असतो, हा वेगळा विषय होऊ शकतो. कितीही ऊन असले तरी शेतमजुरांना काम करणे क्रमप्राप्त आहे. कारण आगामी काळात हाताला रोजगार नसल्याची जाणीव शेतमजुरांना झाली आहे. आज तळपत्या उन्हात काम केल्यावर त्याचा त्रास कधीतरी हमखास होऊ शकतो याचा अनुभव यापूर्वी अनेकांना आला आहे.

Dhule Summer Heat
Dhule Lok Sabha Constituency : निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्दे केंद्रस्थानी! 10 वर्षात सर्वांगिण विकासाअभावी मतदारात रोष

दिवसरात्र काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा अन् दुसरीकडे अनेक कौटुंबिक समस्या आ वासून उभ्या असतात त्या वेगळ्याच. सतत कष्ट करूनही पदरी काहीच पडत नाही. यंदा उन्हाचे चटके लाही लाही करत असल्याच्या प्रतिक्रिया महिला मजूर नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त करतात. वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, पण सांगायच्या कोणाला? आपले आयुष्य कष्टात गेले, किमान मुलांचे शिक्षण तरी नीट पार पडावे यासाठी शेतमजुरांचा हा संघर्ष सुरूच आहे.

लोकशाहीवरचा दृढविश्वास

सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचा पडघम वाजू लागला आहे. खेडोपाडी प्रचारयंत्रणेचा धुरळा उडत आहे. कसली तरी निवडणूक आहे इतकीच जाणीव या प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांना आहे. सत्तेत कोणीही आले तरी या जन्मी तरी आपला विकास नाही किंवा ‘अच्छे दिन’ पाहणे स्वप्नी नाही याची जाणीव त्यांना आहेच.

निवडणुकीतून आपल्याला काय मिळणार याचा अंदाज नसला तरीही लोकशाहीवरचा विश्वास दृढ करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणार आहोत, अशी प्रतिक्रिया ते देतात. यंदा एप्रिल महिना संपला तरी उन्हाची काहिली काही कमी होत नाही. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाही शेतमजूर शेतात राबताना दिसतात. उन्हाचा थेट परिणाम शेतमजुरांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

Dhule Summer Heat
Dhule Lok Sabha Election : निवडणूक यंत्रणेकडून सोशल मीडियावर करडी नजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com