धुळे: शहर व परिसरातील चार ठिकाणी मीटरमध्ये फेरफार करून सुमारे ७१ हजार युनिट वीजचोरी केली. वीज महावितरण कंपनीच्या तपासणीत हे प्रकार उघड झाले. संबंधितांना दंडाची रक्कम भरण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र, ती न भरल्यामुळे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले.