Dhule Fake Fertilizer Case : ग्रीनफिल्ड कंपनीचे नमुने अप्रमाणित : कृषी सहसंचालक

Dhule Fake Fertilizer Case Greenfield Company Sample Uncertified news
Dhule Fake Fertilizer Case Greenfield Company Sample Uncertified newsesakal

Dhule Fake Fertilizer Case : येथील मोहाडी पोलिस ठाण्यात दाखल बनावट खतसाठा प्रकरणी गुन्ह्यातील ग्रीनफिल्ड ॲग्रीकेम कंपनीचे कृषी यंत्रणेने घेतलेले नमुने अप्रमाणित आढळले आहेत. त्यामुळे या कंपनीचे १८ः१८ः१० मिश्रखत बनावट असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

त्यामुळे या कंपनीचा शिल्लक खतसाठा कुणीही खरेदी करू नये, असे आवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले. यावरून ग्रीनफिल्ड कंपनीने जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. ()

‘एमआयडीसी’तील दोन गुदामात १३ लाखांवर बनावट मिश्रखताचा साठा कृषी पथकाला आढळला. या प्रकरणी ८ जुलैला सुरत येथील फार्म सन्स फर्टिकेम कंपनी, तरडगाव (ता. फलटण, जि. सातारा) येथील ग्रीनफिल्ड ॲग्रीकेम कंपनी आणि या कंपनीचा मुख्य वितरक व भूमी क्रॉप सायन्सचा चालक नरेंद्र चौधरी (रा. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यात मिश्रखतात फॉस्पो जिप्समचा वापर झाल्याचा संशय कारवाईवेळी कृषी यंत्रणेने व्यक्त केला होता.

दहा दुकानांना ‘विक्री बंद’

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, खत निरीक्षक व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी वादग्रस्त गुदामातून मिश्रखताचे चार नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. ते अप्रमाणित आले आहेत. त्यामुळे खतसाठा बनावट असल्याची सिद्ध झाले आहे. तत्पूर्वी, यासंदर्भात कृषी सहसंचालक वाघ यांच्या निर्देशानुसार खानदेशातील १९ कृषिसेवा केंद्रांची तपासणी हाती घेण्यात आली.

यात जिल्ह्यातील साक्री व शिरपूर तालुक्यांतील १३ केंद्रांचा समावेश होता. या कारवाईत एकूण २७ कृषिसेवा केंद्रे तपासली गेली.

Dhule Fake Fertilizer Case Greenfield Company Sample Uncertified news
Dhule Fake Fertilizer Case : कृषी यंत्रणेतर्फे धुळे पिंजण्यास सुरवात; 4 खत विक्रेत्यांना विक्री बंदचा आदेश

त्यातून नऊ नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत. सरासरी दहा केंद्रांना विक्री बंदचा आदेश देण्यात आला असून, बनावट खताच्या तीन हजार ३८७ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पाच दिवसांची मुदत

कारवाईतील कृषी सेवा केंद्रांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. नंतर सुनावणी होईल व त्यात पुन्हा त्रुटी आढळल्यास तरतुदीनुसार संबंधितांवर योग्य त्या कारवाईची पावले उचलली जातील, असे श्री. तायडे यांनी सांगितले.

फॉस्पो जिप्समची भेसळ

नमुन्यांमधील बनावट मिश्र खतसाठ्यात फॉस्पो जिप्समची भेसळ असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले आहे. अधिकतर ग्रीनफिल्ड कंपनीच्या कृषी राजा ब्रॅन्डमध्ये हा प्रकार आढळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वादग्रस्त कंपनीच्या शिल्लक खतसाठ्याची खरेदी करू नये किंवा विक्री होऊ नये, असेही आवाहन कृषी सहसंचालक वाघ यांनी केले आहे.

Dhule Fake Fertilizer Case Greenfield Company Sample Uncertified news
Dhule Fake Fertilizer Case : कृषी पथकातर्फे सोनगीरच्या केंद्राची तपासणी; खानदेशात लोण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com