farm road
sakal
धुळे: शेतरस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांवरील वादांना आता प्रशासकीय पातळीवर निर्णायक हातभार लागणार आहे. तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची केवळ नोंद करून प्रकरण थंडबस्त्यात टाकण्याची प्रथा महसूल विभागाने मोडीत काढली. या आदेशानंतर सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे संबंधित महसूल अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती या यंत्रणेतील सूत्रांनी दिली.