A farm laborer from Patan was admitted to Shindkheda Rural Hospital due to water poisoning in Chirane.
esakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule News : चिरणे येथे शेतमजुरांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा! 10 महिला, एक पुरुष अन 18 मुला-मुलींचा समावेश; प्रकृती स्थिर
Dhule News : महादेवनगरातील सुमारे २९ मजुरांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाली असून, त्यात दहा महिला, एक पुरुष, १५ मुली व तीन लहान मुलांचा समावेश आहे.
चिमठाणे : चिरणे (ता. शिंदखेडा) शिवारात बुधवारी (ता. २१) कपाशीच्या निंदणीसाठी पाटण (ता. शिंदखेडा) येथील महादेवनगरातील सुमारे २९ मजुरांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाली असून, त्यात दहा महिला, एक पुरुष, १५ मुली व तीन लहान मुलांचा समावेश आहे. बाधितांवर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Farm workers poisoned by drinking water in Chirane)