धुळे- अवकाळी पावसाने दोन दिवसांत केलेल्या नुकसानात धुळे तालुक्यातील सरासरी दोन हजार ३१८ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने गुरुवारी (ता. ३) सादर केला. शिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त शेती भागाचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचा आदेश पणन तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी महसूल व कृषी यंत्रणेला दिला.