agricultural loss
sakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule News : धुळे ग्रामीणला मोठा दिलासा! अतिवृष्टीग्रस्त १६ हजार शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी १० हजारांचे विशेष पॅकेज मंजूर
Government Sanctions ₹11.61 Crore Relief for Dhule Farmers : जून ते सप्टेंबर २०२५ या काळात धुळे ग्रामीणमधील बोरकुंड आणि मोघण मंडलात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. शासनाने आता बाधित १६ हजार ४२९ शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील बियाणे व इतर खर्चासाठी प्रति हेक्टरी १०,००० रुपयांचे विशेष मदत पॅकेज मंजूर केले आहे.
कापडणे: धुळे ग्रामीणमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकरी बाधित झाले आहेत. यात बोरकुंड व मोघण मंडलातील अतिवृष्टीचा समावेश आहे. या शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. आता अतिरिक्त मदतीसाठी विशेष मदत पॅकेजचा निर्णय शासनाने घेतला आहे.
