धुळे: खरीप हंगामात रासयनिक खत विक्रीतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असतात. ते घडू नये यासाठी दक्षता बाळगताना जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने जिल्ह्यातील ३२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने काही काळासाठी निलंबीत केले आहेत. यात शिरपूर येथील दोन केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. यापुढेही फसवणुकीचे प्रकार समोर आल्यास कृषी केंद्र चालकांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.