
Dhule Flood News : शहरासह जिल्ह्यात पाचव्या दिवशी मंगळवारी (ता. २७) पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. धुळ्यात मुसळधार, नंतर रिमझिम, तर साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मात्र तो बरसत होता. पश्चिम पट्टा वगळता दुपारी चारनंतर पावसाने जिल्ह्यात सर्वत्र विश्रांती घेतली. धरण क्षेत्रातही त्याने विश्रांती घेतल्याने पांझरा नदीचा पूर ओसरला. त्यामुळे धुळे शहरातील दोन लहान पूल, मोरी पूल, ब्रिटिशकालीन मोठ्या पुलाचा भाग सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. (flood of Panzara river is decreased )