Dhule Fraud Crime : ट्रकचालकांना पाऊण लाखाचा गंडा; धुळे जिल्ह्यात नकली GST अधिकारी पराक्रम

Fraud Crime : वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) चार नकली अधिकाऱ्यांचे आणखी दोन पराक्रम चव्हाट्यावर आले आहेत.
Fraud Crime
Fraud Crimeesakal

Dhule Fraud Crime : वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) चार नकली अधिकाऱ्यांचे आणखी दोन पराक्रम चव्हाट्यावर आले आहेत. त्यांनी दोन ट्रकचालकांना पाऊण लाखाचा गंडा घातला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर देवभाने (ता. धुळे) फाट्याजवळ एका ट्रकचालकाला २१ हजारांना लुटले. तसेच शहरातील पारोळा रोडवर चौघांनी जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करून दुसऱ्या ट्रकचालकाची ५० हजारांची फसवणूक केली. नकली जीएसटी अधिकारी प्रकरणी जिल्ह्यात आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. ( Truck driver fraud Rs 5 lakh )

संजय इंद्रदेव यादव (वय ३८, रा. आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश) या ट्रकचालकाच्या फिर्यादीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावर देवभाने फाट्याजवळ एका हॉटेलसमोर संजय यादव यांना चौघांनी लुटले. वाहनचालक यादव हे ट्रक (एमएच ०१ डीआर ३८४०) घेऊन जाताना त्यांना देवभाने गावाजवळ लाल दिव्याच्या लोखंडी जाळीच्या सुमो वाहनातून साध्या वेशातील चौघांनी अडविले.

जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून ट्रकमधील मालाच्या बिलामध्ये चुका असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे व्यवस्थापकासोबत यादव यांनी चौघांचे बोलणे करून दिले. जीएसटी दंडाची एक लाख रक्कम भरावी लागेल, असे चौघांनी सांगितले.

गुगल-पेचा वापर

तडजोडीअंती २१ हजार गुगल पे-द्वारे (७७०९४५१५१२ क्रमांकावर) चौघांनी स्वीकारून यादव यांची फसवणूक केली. २८ ऑक्टोबर २०२३ ला दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.२१) चौघांविरूद्ध यादव यांनी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा तिसरा गुन्हा आहे.

Fraud Crime
Dhule Fraud Crime : फसवणूक प्रकरणातील फरारी संशयित 5 गजाआड

बिलात चूक सांगितली

दुसरे तक्रारदार शेखर चंद्रकांत पाठक (वय ३७, रा. दिल्ली) यांना २६ सप्टेंबर २०२३ ला दुपारी दोनच्या सुमारास जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत ४९ हजारांचा गंडा घातला. शेखर पाठक हे नोएडा येथील कंपनीत व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून काम करतात. श्रीजी प्रोसेस या मुंबईच्या कंपनीने दिलेल्या ऑर्डरनुसार नगर (महाराष्ट्र) येथील माल पोचता करायचा होता. ट्रकमध्ये माल भरून तो धुळेमार्गे जाताना शहरातील पारोळा रोडवर लाल दिव्याच्या वाहनात बसलेल्या चौघांनी जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून ट्रक अडविला.

बिलात चूक आहे, तुम्हाला दोन लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड भरावा लागेल, असे धमकावले. नंतर जीएसटी अधिकारी असल्याचा बनाव केलेल्या एकाने व्हॉटस्अप कॉल करून ४९ हजार ५०० रुपये तत्काळ द्या, तुमचा ट्रक सोडून देऊ, असे सांगितले. वेळेत माल पोचावा, यासाठी ४९ हजार ५०० रुपये फोन पे-द्वारे दिले. फसवणूकप्रकरणी चौघा नकली जीएसटी अधिकाऱ्यांवर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सीआयडीकडे तपास

धुळे शहरात नकली जीएसटी अधिकारी प्रकरणी दाखल गुन्ह्यात काही पोलिस कर्मचारीच अडकले आहेत. ते सध्या अटकेत आहेत. तत्कालीन बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावर या गुन्ह्याला सुरवात झाली. त्यासाठी पोलिस विभागाचे लाल दिव्याचे वाहन पुरविण्यात आले. पंजाबमधील व्यापाऱ्याला नकली जीएसटीच्या नावाखाली लुटल्यानंतर त्याने पाठपुरावा करत धुळ्यातील या गुन्ह्याचे बिंग फोडले.

यानंतर शिरपूरला गुन्हा दाखल झाला. या पाठोपाठ सोनगीर येथे तिसरा व आझादनगर पोलिस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी सीआयडीकडे तपास वर्ग झालेला असून अद्याप बडा मासा त्यांनी गळाला लावलेला नाही. यासंदर्भात अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळण्याची सूचना यंत्रणेला दिली आहे.

Fraud Crime
Dhule Fraud Crime News : धुळेतील माजी मंत्र्यांसह चौघांवर शेत मिळकतीबाबत गैरव्यवहाराचा गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com