Dhule News : महापालिकेकडून रोपांचे मोफत वाटप! वनीकरण विभागातर्फे 60 हजार रोपे प्राप्त; नागरिकांनी संपर्क साधावा

Dhule News : सामाजिक संस्थांनाही महापालिकेने ही मोफत रोपे वाटप सुरू केली आहेत. याबाबत आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी पाहणी केली.
Amita Dagde and other officers and employees present during the inspection of plants in the Municipal Corporation
Amita Dagde and other officers and employees present during the inspection of plants in the Municipal Corporationesakal

Dhule News : वृक्षलागवड व संवर्धन मोहिमेंतर्गत महापालिकेस सामाजिक वनीकरण विभागाकडून विविध जातींची ६० हजार रोपे प्राप्त झाली आहेत. ती महापालिकांच्या जागांवर लागवड होतील. सामाजिक संस्थांनाही महापालिकेने ही मोफत रोपे वाटप सुरू केली आहेत. याबाबत आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी पाहणी केली. (Dhule Free distribution of plants from Municipal Corporation)

शासनामार्फत वृक्षलागवड व संवर्धनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे दीड लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या निर्देशासह मार्गदर्शनाने सामाजिक वनीकरण विभागामार्फत महापालिकेस ६० हजार रोपे प्राप्त झाली आहेत. यात चिंच, साधा पेरू, लाल पेरू, कांचन, जांभूळ, सीताफळ, बेल, आवळा, शिशू आदी प्रकारची रोपे आहेत.

रोपांचे मोफत वाटप

शहरातील मनपा मालकीची जागा, इतर खुल्या जागा आदी ठिकाणी खड्डे खोदून वृक्षलागवड करणे, तसेच सामाजिक संस्था व नागरिकांना वृक्षलागवडीसाठी रोपे मोफत देण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रक्रियेची आयुक्त दगडे-पाटील यांनी पाहणी केली. दोन दिवसांत सुमारे सहा ते सात हजार रोपांचे नागरिकांना वाटप झाले. वृक्षवाटपाबाबत तपशीलवार नोंद घेण्यात येत आहे. महापालिकेमार्फत वृक्षलागवड व संवर्धनाची संबंधित ठिकाणी पाहणी केली जाईल. (latest marathi news)

Amita Dagde and other officers and employees present during the inspection of plants in the Municipal Corporation
Maharashtra BJP: लोकसभेच्या पराभवानंतर भाजपचे 'ऑपरेशन' सुरू; प्रमुख यंत्रणा केल्या बरखास्त

मियावाकी पद्धत

कॉलनी परिसरातील संरक्षण भिंती असलेल्या मोकळ्या जागा, अक्कलपाडा व लाटीपाडा येथे वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच कंपोस्ट डेपो येथे एक एकर जागेवर मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड केली जाईल. ठराविक ठिकाणी बांबू प्लांटेशनचे नियोजन आहे.

तलाव परिसरातील मनपा मालकीच्या मोकळ्या जागेत चिंच वृक्षांची लागवड केली जाईल. शहरात विभागवार कनिष्ठ अभियंता व स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती झाली आहे. तसेच प्रत्येक मनपा कर्मचाऱ्यास पाच वृक्षलागवड व संवर्धनाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

नागरिकांना आवाहन

उपायुक्त हेमंत निकम, शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त समीर शेख, नगरसचिव मनोज वाघ, शाखा अभियंता चंद्रकांत उगले, मुख्य स्वच्छता अधीक्षक राजेश वसावे, चंद्रकांत जाधव, विकास साळवे, तसेच वृक्ष अधिकारी रविकिरण पाटकरी आदी उपस्थित होते. नागरिकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले.

Amita Dagde and other officers and employees present during the inspection of plants in the Municipal Corporation
Vidhan Prishad Election: फडणवीसांची आकडेमोड विधानपरिषद जिंकणार ? भाजप आमदारांना दिली मतदानाची गुरुकिल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com