
धुळे : सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या परिसरातून कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व निजामपूर (ता. साक्री) पोलिसांच्या पथकाने छडा लावला. टोळीतील पाच संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख २९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन फरारींचा शोध सुरू आहे. या कारवाईद्वारे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. (gang of copper cable thieves arrested in Nizampur)