Dhule News : नवरंगजवळील कचरा डेपो अखेर बंद!

Dhule : नवरंग जलकुंभाजवळ धुळे महापालिकेचे दुय्यम कचरा संकलन केंद्र आहे. यामुळे मात्र परिसरातील नागरिकांना, वसतिगृहातील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
Residents of the area locking the entrance to the secondary waste collection center near Navrang Jalkumbha.
Residents of the area locking the entrance to the secondary waste collection center near Navrang Jalkumbha.esakal

Dhule News : शहराच्या देवपूर भागात नवरंग जलकुंभाजवळील कचरा डेपो (दुय्यम कचरा संकलन केंद्र)मुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असताना तो हटविला जात नसल्याने मनसे पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी गुरुवारी (ता. २८) या कचरा डेपोला टाळे ठोकत घंटागाड्या रोखल्या. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांची समजूत काढली. (Dhule Garbage depot near Navrang finally closed)

दुय्यम कचरा संकलन केंद्राच्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे आश्‍वासन दिले. नवरंग जलकुंभाजवळ धुळे महापालिकेचे दुय्यम कचरा संकलन केंद्र आहे. यामुळे मात्र परिसरातील नागरिकांना, वसतिगृहातील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होतो. गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास सहन करत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

त्यामुळे हा कचरा डेपो तेथून तत्काळ हटवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्तांकडे केली होती. कचरा डेपो तेथून न हटल्यास महापालिकेसमोर कचरा आणून टाकू, असा इशाराही दिला होता. दरम्यान, याबाबत कार्यवाही होत नसल्याने अखेर रहिवाशांनी कचरा डेपोला टाळे ठोकले. (latest marathi news)

Residents of the area locking the entrance to the secondary waste collection center near Navrang Jalkumbha.
Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात उत्साहाचा अभाव; महाविकास आघाडीमध्ये सामसूम

मनसेच्या प्राची कुलकर्णी यांनी याबाबत आयुक्तांचीही भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला व डेपो हटविण्याची मागणी केली. कचरा डेपो हटविण्याबाबत कार्यवाही होत नाही तोपर्यंत एकही घंटागाडी कचरा डेपोत जाऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे महापालिकेचे उपायुक्त हेमंत निकम, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अधिकाऱ्यांनी कचरा डेपोवर स्वच्छतेचे आश्‍वासन दिले. दरम्यान, नवरंग जलकुंभाजवळ घंटागाड्या न पाठविता त्या थेट कचरा डेपोवर पाठविण्यात येणार आहेत. कचरा डेपोची ही समस्या इतर पक्षांना तीन वर्षांत सोडविता आली नाही. मनसेने ती सहा दिवसांत सोडविल्याचे मनसेच्या श्रीमती कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Residents of the area locking the entrance to the secondary waste collection center near Navrang Jalkumbha.
Dhule ZP News : जिल्हा परिषद सीईओ नरवाडेंनी स्वीकारला पदभार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com