Dhule Milk Rate Hike : चाराटंचाईमुळे दुधाची दरवाढ! म्हशीचे 70, तर गायीचे 55 रुपये लिटरने विक्री

Dhule News : दुष्काळामुळे हिरवा चारा महागला आहे. त्यामुळे दुधाचे दरही वाढले आहेत. शहरात म्हशीचे दूध सरासरी ७० ते ८० रुपये लिटरवर पोचले आहे, तर गायीचे दूध सरासरी ५० ते ५५ रुपयांवर.
prices of milk increased
prices of milk increasedesakal

Dhule News : दुष्काळामुळे हिरवा चारा महागला आहे. त्यामुळे दुधाचे दरही वाढले आहेत. शहरात म्हशीचे दूध सरासरी ७० ते ८० रुपये लिटरवर पोचले आहे, तर गायीचे दूध सरासरी ५० ते ५५ रुपयांवर पोचल्याने सर्वसामान्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पावसाअभावी मका, बाजरी व इतर पिके करपल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा चाराही लागला नाही. (Dhule Green fodder has become expensive due to drought Due to this prices of milk also increased)

जिल्ह्यात २०२३ च्या पावसाळ्यात एकूण ४३३.७ मिलिमीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या ८१.०५ टक्के इतका पाऊस झाला. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये सरासरी २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी १९८.८१ दलघमी (४०.८६ टक्के) जलसाठा शिल्लक होता. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी आजअखेर ८५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दोनदा आढावा बैठक

शिंदखेडा तालुक्यातील डाबली, धावडे, रहीमपुरे व धुळे तालुक्यातील तिसगाव, वडेल येथे एकूण पाच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. तसेच धुळे, साक्री, शिरपूर या तीन तालुक्यांतील एकूण २८ महसूल मंडळांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने तसेच पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित पाण्याचे आवर्तन सोडण्याकामी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा जिल्हास्तरीय संबंधित विभागांची आढावा बैठक झाली आहे.

चाऱ्याची स्थिती

दुसऱ्या तालुक्यांमधून चाऱ्याची वाहतूक करून शेतकरी आता जनावरांना जगवतो आहे; परंतु गाय, म्हैस, गीर गायी आदींना हिरवा चारा लागतो. दिवसभरात गायीला सरासरी ४० किलो चारा लागतो. तसेच म्हशीला सरासरी ५० किलो चारा लागतो. (latest marathi news)

prices of milk increased
Dhule Code Of Conduct : परवानाधारकांची 482 शस्त्रे जिल्ह्यातून जमा; लोकसभा निवडणुकीमुळे कार्यवाही

चार ते पाच रुपये किलोप्रमाणे हा चारा मिळत असल्याने एका दिवसाला सरासरी १६० ते २०० रुपयांपर्यंत खर्च शेतकऱ्यांना येतो. त्यावर उपाय म्हणून मुरघास बॅगमध्ये हिरव्या चाऱ्याचे तुकडे करून साठविला आहे. एक, तीन व पाच टनची एक बॅग असल्याने चारा साठविणे शक्य होत आहे.

दुधाचे दर वाढले

चाऱ्याचे दर वाढल्याने परिणामी शहरी भागात दुधाचे दर वाढले आहेत. म्हशीचे साधे दूध सरासरी ६५, तर प्युअर ७० ते ८० रुपये लिटर, गायीचे सरासरी ५० ते ५५ रुपये लिटरने विक्री होत आहे. ग्रामीण भागातील डेअरीमध्ये हा दर अनुक्रमे सरासरी ४० व २५ रुपये असल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते. डेअरीधारकांनी गायीच्या दुधाचे दर दोन रुपयांनी कमी केले आहेत.

टँकरचीही दरवाढ शक्य

ग्रामीण भागात सद्यःस्थितीला जनावरांना चाऱ्यापेक्षा पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. चारा दुसऱ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून विकत आणणे शक्य आहे; परंतु पाणी मिळणे अवघड होत असल्याने टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागते. पाच हजार लिटरच्या टँकरसाठी पंधराशे रुपये खर्च करावे लागतात. टँकरचे दर अजूनही वाढतील, असा अंदाज आहे..

prices of milk increased
Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभेचा उमेदवार बदला काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी; जिल्हाध्यक्ष सनेर यांचा राजीनामा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com