Sikh Community Protests
sakal
धुळे: शहरातील गुरुद्वारामध्ये गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा धीरजसिंग यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा १० डिसेंबरला मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही संशयितांची योग्य चौकशी होत नसल्याचा आरोप करत शीख बांधवांनी रविवारी (ता. ४) शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.