.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Dhule Crime News : मध्यप्रदेशातून धुळ्याकडे निघालेल्या ट्रेलरमधून सांगवी पोलिसांनी सुमारे १२ लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि तंबाखू जप्त केली. ही कारवाई ३० ऑगस्टला रात्री पावणेबाराला हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्यावर करण्यात आली. चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना गुटख्याच्या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. (Gutkha seized for sale Sangvi police action at Hadakhed checkpoint )