Heavy Rain Hits Dhule City and Surrounding Areas : धुळे शहरात शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने रस्ते, चौक व शासकीय कार्यालयांच्या आवारात पाणी साचले, नकाणे तलाव ओव्हरफ्लो झाला आणि विजेचा पुरवठा खंडित झाला.
धुळे: मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने दोन दिवसांत धुळे शहर व परिसराला अक्षरशः झोडपून काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऑगस्टमध्ये अधूनमधून शिडकावा करणाऱ्या पावसाने शुक्रवारी (ता. १५) रात्री जोरदार हजेरी लावली.