Wedding Ceremony Fashion : किंमती वस्त्रे विवाहानंतर ठरतात आठवणीपुरतेच! फॅशनच्या नावाखाली दुष्काळातही खर्च वाढताच

Dhule News : केवळ लग्नाच्या दिवशी परिधान केलेले वस्त्रे नंतर मात्र कपाटात विराजमान होतात. महागडी शेरवानी महावस्त्रांचे ‘महावजन’ केवळ आठवणीपुरतेच शिल्लक राहते.
Wedding Clothing
Wedding Clothingesakal

म्हसदी : यंदाच्या लग्नसराईत लाखो रुपयांची उधळण होत असल्याचे चित्र आहे. बदलता प्रवाह, फॅशनच्या नावाखाली ऐन दुष्काळातही लग्नकार्याचा खर्च वाढताच असल्याचे चित्र आहे. ‘हौसेला मोल नसते’ म्हणत बेलगाम खर्च केला जात असल्याचे सर्वश्रृत आहे. लग्नात वधू-वराचे आकर्षण असते ते परिधान केलेले कपडे. किंमती सूट, सफारी, महावस्त्र, शालू आणि अलिकडचा शेरवानी, घागरा हे केवळ लग्नाच्या दिवशी परिधान केलेले वस्त्रे नंतर मात्र कपाटात विराजमान होतात. महागडी शेरवानी महावस्त्रांचे ‘महावजन’ केवळ आठवणीपुरतेच शिल्लक राहते. (Dhule high prices clothes abandoned after wedding news)

अलिकडे प्रत्येक गोष्टीत फॅशनचा प्रभाव वाढत चालला आहे. काठपदरी साडीचे महावस्त्र, घागरा, दुल्हन साडी अशा विविध प्रकारात आलेले महावस्त्र ‘फॅशन’ म्हणून नववधू परिधान करते. लग्नाच्या काळात बाजारात ज्या साड्यांचा ट्रेंड असतो, त्यापैकी महावस्त्र म्हणून खरेदी केली जाते. काळानुरूप फॅशनचा ट्रेंड ही बदलत आहे. तशी तरुणींची मानसिकता बदलते. सध्या वेगळी फॅशन आल्याचे कारण सांगत विवाह सोहळ्यासाठीचा पेहराव मात्र बदलत चालला आहे.

जुनी परंपरा येतेय पुढे

हिंदू संस्कृतीत पूर्वीच्या काळी लग्नात महावस्त्र म्हणजेच बनारसी शालू असायचा. त्याचीच जागा अलिकडे बनारसी पेशवाईने वैदिक पद्धतीने घेतली आहे. काळानुसार आता महावस्त्र लोप पावत चालले असून, त्याची जागा आता ‘घागरा’ने घेतली आहे. नववधू घागराला विशेष पसंती देत आहे.

फॅशन म्हणून जुनी परंपरा पुढे येत आहे. आता वैदिक पद्धतीनुसार लग्न लावण्याचा आग्रही धरला जात आहे. यासाठी युवा पिढीच पुढे असल्याने तो प्रवाह झपाट्याने वाढत आहे. नव वधू-वर जुन्या परंपरेनुसार वधू नववारी साडी, तर वर पेशवाई पद्धतीचे वस्त्र परिधान करीत बोहल्यावर चढताना दिसत आहेत. जुन्या परंपरेची वैदिक पद्धत अतिशय महत्त्वाची मानली जाते.

या पद्धतीत होम - हवन, कन्यादान, सप्तपदी या तीन विधींना अनन्यसाधारण महत्व आहे. विवाह सोहळ्यात परिधान करावयाच्या सर्व साड्यांपेक्षा महावस्त्र आकर्षक व महागडे असते. परिस्थिनुसार प्रत्येक जण आपापले महावस्त्र खरेदी करतात. तेवढ्या क्षणापुरते कदाचित महावस्त्राचे भावनिक वजन असेलही.

पण, आर्थिक परिस्थिती जशी बदलते तशा साड्या महिलांकडून खरेदी होतात. लग्नावेळी आर्थिक परिस्थिती नव्हती, पण आता आम्ही महावस्त्रापेक्षा किंमती आणि महागड्या साड्या परिधान करतो. त्यामुळे महावस्त्रांचे महत्त्व बदलते आहे, अशी भावनाही महावस्त्राच्या बाबतीत महिलांच्या आहेत. (latest marathi news)

Wedding Clothing
Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

गोरज मुहूर्तालाही पसंती!

पूर्वी चार - सहा दिवस चालणारा विवाह सोहळा अलिकडे काही तासांवर येऊन ठेपला आहे. पूर्वी गोरज मुहूर्तावर विवाह करण्याची परंपरा होती. धावपळीच्या युगात ही पद्धत मागे पडत चालली असताना अलिकडे धनदांडगे पुन्हा नव्याने गोरज मुहूर्ताला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

पूर्वीच्या काळी गोरज मुहूर्ताचे आकर्षण म्हणजे हिंदू संस्कृतीचे प्रदर्शन मानले जात असे. अलिकडचा गोरज मुहूर्त म्हणजे रोषणाई आणि श्रीमंतीचा झगमगाट दाखविण्याचा प्रयत्न असतो. पूर्वीची बैलगाडीवरची मिरवणूक (बिद),वैदिक विवाह, गाव पंगत अशा आठवणी फक्त ज्येष्ठांच्या तोंडून नकळत बाहेर पडतात. अलिकडे वेळेची उपलब्धता व दळणवळणाच्या साधणे, वारेमाप उपलब्ध असल्याने विवाह सोहळे आटोपते घेतले जातात.

यंदा सुरवातीपासून विविध समारंभाची धामधूम सुरू होती.एका घरामध्ये एकाच तारखेच्या सहा ते सात पत्रिका आल्याने कोणत्या लग्नाला जावे, असा प्रश्न भेडसावत होता. विवाह सोहळ्यामध्ये काहीसा बदल झाला असला तरी आमंत्रिताची यादी लांबलचक असते.

जेवनावळ, वाद्यवृंद, मंगल कार्यालयाचा खर्च अधिक दिसत असला तरी कपडे, मेकअप, दागिन्यांचा खर्चही सर्वाधिक असल्याचे वास्तव आहे. नवरदेवाच्या मिरवणुकीपेक्षा हळदीच्या दिवशी नाच गाण्यास अधिक महत्त्व दिले जाते. अलिकडे लग्नासारखे कार्यक्रम प्रतिष्ठेचे श्रीमंतीचे दिखाऊ झाल्यासारखे दिसतात.

"हौसेला मोल नसते. माझ्या लग्नात प्रत्येक हौस पूर्ण करेल, असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. आणि ते वावगेही नाही. आपली लेक सुखात राहावी म्हणून प्रत्येक मुलीच्या आई-वडीलांची अनेक स्वप्ने,आशा - आकांक्षा असतात. घरची आर्थिक परिस्थिती पाहून नववधूने लग्नाची खरेदी ,खर्च करावा हीच माफक अपेक्षा.!"- नयना ठाकरे-ह्याळीस, कळंबीर (ता.साक्री)

Wedding Clothing
Wedding Muhurat: मे, जून महिन्यामध्ये विवाहासाठी नऊ मुहूर्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com