धुळे- प्राथमिक शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेची सक्ती नकोच, अशी भूमिका घेत राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाभरातील पालक-विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून राज्य शासनाच्या विरोधात मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिला. मागणीच्या अनुषंगाने पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.