
Dhule Heavy Rain : शहरात मंगळवारी (ता. २०) सायंकाळी दुसऱ्या दिवशीही तासभर मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक, मनपाची जुनी इमारत, देवपूरमधील अंडाकृती उद्यानाजवळील रस्त्यांवर पाणी साचले.
पावसामुळे फेरीवाल्यांची धावपळ उडाली. तासाभरात जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत तो सुरळीत न झाल्याने अंधाराचे साम्राज्य होते. मात्र, नागरिकांची उकाड्यातून तात्पुरती सुटका झाली. (Hour long torrential rain on roads)