Dhule police
sakal
धुळे: घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीरपणे वापर करून वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या (रिफिलिंग) धोकादायक प्रकारावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार शहरातील वेगवेगळ्या सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे २५ हजार ४०० रुपये किंमतीचे ७ गॅस सिलिंडर आणि रिफिलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले.