धुळे- गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस अनधिकृतपणे बाळगून दहशत माजविण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी बायपासजवळ सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ४१ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (ता. २) दुपारी बाराच्या सुमारास तिखी रस्त्यावर करण्यात आली.