Dhule News : हाडाखेड चेक नाक्यावर अवैध वाहतूक; आरटीओ अन् पोलिसांचे दुर्लक्ष

Dhule : हाडाखेड चेक नाक्यावरील मागच्या बाजूने बायपास रस्त्यावरून अवैध वाहतूक होत आहे.
containers during illegal transportation through bypass road at check post.
containers during illegal transportation through bypass road at check post. esakal

Dhule News : हाडाखेड चेक नाक्यावरील मागच्या बाजूने बायपास रस्त्यावरून अवैध वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे सदभाव कंपनीच्या लाखो रुपयांचे नुकसान होत असताना शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. ही अवैध वाहतूक रोखण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांसह सीमा सुरक्षा पोलिस दलातील अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी चर्चा लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांमधून होत आहे. Dhule Illegal traffic at Hadakhed check post)

हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी चेक नाका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा नाका आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्रकडून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) तपासणी नाक्यावर वाहनांमध्ये असलेल्या मालाचे वजन, मालाचे अधिकृत बिले तपासली जातात. ओव्हरलोड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. तसेच रस्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

त्यामुळे ओव्हरलोड वाहनांवर दंड आकारला जातो. अधिकचा दंड वाचविण्यासाठी ओव्हरलोड आणि कागदपत्रे अपूर्ण असलेली वाहने सीमा तपासणी नाका टाळण्यासाठी चेक नाक्याच्या मागच्या दोन्ही बाजूने बायपास कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे त्या रस्त्यावरून चोरट्या मार्गाने तपासणी नाका चुकवत हाडाखेड गावापर्यंत मुख्य महामार्गाला येतात.

या चोरट्या वाहतुकीमुळे काही वाहनांत अवैध दारू, गांजा, गुटखा, अमली पदार्थ, गुरांचीही वाहतूक होत असल्याचे नाकारता येत नाही. स्थानिक आरटीओ अधिकारी व सीमा सुरक्षा पोलिस प्रशासन कर्मचारी हजर असतानासुद्धा अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे.

containers during illegal transportation through bypass road at check post.
Dhule News : धुळ्यात 99 पानटपरीधारक, विक्रेत्यांना दंड

त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचा महसूल बुडतो. हे टाळण्यासाठी बायपास रस्त्यावर दोन्ही बाजूने बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे. परंतु सहा महिन्यांपासून बॅरिकेडिंग तुटलेल्या अवस्थेत आहे. दुसरीकडे बॅरिकेडिंगच्या बाजूने रस्ता तयार करण्यात आला आहे. म्हणून अवैध वाहतूक सुरू आहे. ही अवैध वाहतूक बंद करण्यासाठी कलेक्टरसाहेबांनी दखल घ्यावी, असे मत लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थ करीत आहेत.

"बायपास रस्त्याने अवैध वाहतूक होत असल्यासंदर्भात सदभाव कंपनी हाडाखेड यांच्याकडून धुळे कलेक्टर ऑफिसला पत्र देण्यात आले होते. परंतु अद्याप अवैध वाहतुकीविषयी कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही."- वैभव पवार, बी.सी.पी. हेड (हाडाखेड सदभाव कंपनी)

containers during illegal transportation through bypass road at check post.
Dhule News : कंत्राटी वीज कामगारांचे धुळ्यात अर्धनग्न आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com