Dhule Crime News : वन विभागाच्या कारवायांमध्ये सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime : वन विभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून वाहन, लाकूड आणि यंत्रसामग्री मिळून दोन लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
Forest department team with seized timber and machinery.
Forest department team with seized timber and machinery.esakal
Updated on

Dhule Crime News : येथील वन विभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून वाहन, लाकूड आणि यंत्रसामग्री मिळून दोन लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. लाकडांची चोरटी वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून २७ मेस वन विभागाच्या पथकाने अर्थे-वाघाडी रस्त्यावर सापळा रचला होता. संशयित पिक-अपला थांबवून झडती घेतली असता लिंबाच्या झाडांची कत्तल करून अवैध वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. ()

या कारवाईत पथकाने पिक-अप आणि लाकूड असा एकूण एक लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कारवाईदरम्यान मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत दहिवद (ता. शिरपूर) येथे किरण फर्निचर या दुकानावर पथकाने छापा टाकला. तेथे लाकडापासून विनापरवाना फर्निचर तयार करीत असल्याचे आढळले.

Forest department team with seized timber and machinery.
Dhule Crime News : बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा! भरारी पथकाची कारवाई; सव्वासात लाखांचा मुद्देमाल पकडला

घटनास्थळावरून वन विभागाने १२ इंच रंधा मशिन, कटर मशिन, सागवान जुन्या लाकडापासून तयार केलेले दरवाजे, चौकटी व इतर कट साइझ सागवानाचे सव्वा घनमीटर लाकूड असा ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे प्रादेशिक वनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज, उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, विभागीय वन अधिकारी दक्षता सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल के. डी. देवरे, वनपाल आर. ई. पाटील, दीपिका पालवे, भारती राजपूत, वनरक्षक मनोज पाटील, कृष्णकांत साळुंखे, ज्योतिबा कांदे, राहुल देसले, विजय शिंदे, सोनल मगरे, भारती पावरा आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Forest department team with seized timber and machinery.
Dhule Crime News : धुळ्यात 137 जणांवर गुन्हा; संशयितांचे धरपकडसत्र सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.