District Bank
sakal
धुळे: जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमध्ये गेल्या दशकभरापासून ‘इनऑपरेटिव्ह’ म्हणजेच निष्क्रिय असलेल्या खात्यांमध्ये तब्बल ३३ कोटींपेक्षा अधिक रक्कम पडून असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रलंबित निधीचा लाभ मूळ खातेदारांना मिळवून देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.