Superintendent of Police Shrikant Dhivere, Sanjay Bamble, Anil Bagul etc. present during the interrogation along with the suspects who withdrew Rs 5 lakh from the Union Bank branch.
Superintendent of Police Shrikant Dhivere, Sanjay Bamble, Anil Bagul etc. present during the interrogation along with the suspects who withdrew Rs 5 lakh from the Union Bank branch.esakal

Dhule Crime : बँकेतून 5 लाख लांबविणाऱ्यांना अटक; साक्रीतील युनियन बँकेत घटना

Dhule Crime : पाच लाख रुपये लांबविणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Published on

साक्री : शहरातील युनियन बँकेच्या शाखेतून गुरुवारी (ता. ३) वृद्ध बाबूलाल नारायण गहिवडे (रा. कावठे, ता. साक्री) यांच्या हातातील कापडी पिशवीतून पाच लाख रुपये लांबविणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येथील स्टेट बँकेच्या शाखेत संशयित शुक्रवारी (ता. ४) रेकी करताना आढळले. त्या वेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. (Incident in Union Bank in Sakri arrested those who withdraw 5 lakhs from bank )

विशेष म्हणजे बँकेत कामानिमित्त आलेल्या एका महिलेला दोघांच्या हालचालींचा संशय आल्याने तिने हा प्रकार बँक व्यवस्थापक व सुरक्षारक्षकांना सांगितला. त्यांनी सतर्कतेने कळवत दोन संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

रोकड लांबविली

शहरात ३ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास बाबूलाल गहिवडे हे युनियन बँक शाखेत पाच लाखांचा भरणा करण्यासाठी आले. तिथे दोन अज्ञात व्यक्तींनी श्री. गहिवडे यांच्या हातातील कापडी पिशवी खालून कापून त्यातील पाच लाख रुपये लांबविले होते. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी चारला स्टेट बँकेच्या शाखेत दोन संशयित रेकी करीत असल्याचे बँक व्यवस्थापकांनी पोलिसांना कळविले.

Superintendent of Police Shrikant Dhivere, Sanjay Bamble, Anil Bagul etc. present during the interrogation along with the suspects who withdrew Rs 5 lakh from the Union Bank branch.
Dhule Crime : फरारी 3 गांजा उत्पादकांवर गुन्हा! सांगवी पोलिसांची ड्रोनद्वारे हायटेक कारवाई; 34 लाखांवर मुद्देमाल जप्त

सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल बागूल यांनी लागलीच उपनिरीक्षक विनोद पवार, संदीप संसारे, उमेश चव्हाण, तुषार जाधव, रोशन चित्ते यांना सूचित करीत बँकेत पाठविले. पोलिसांनी दोन्ही संशयितांच्या हालचाली तपासल्यावर त्यांच्यावरील संशय बळावला व त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची विचारपूस केली असता युनियन बँके शाखेतून पाच लाख लांबविल्याचा गुन्हा त्यांनी कबूल केला.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल बागूल, उपनिरीक्षक विनोद पवार, संदीप संसारे, उमेश चव्हाण, संजय शिरसाट, शांतिलाल पाटील, तुषार जाधव, रोहन वाघ, निखिल काकडे आदींनी ही कारवाई केली.

मध्य प्रदेशचे संशयित

तीन सप्टेंबरलाच पिंपळनेर येथून पैसे लांबविल्यासंबंधी गुन्हा केल्याची कबुली दोन संशयितांनी दिली. कबीर बनवारीलाल सिसोदिया (वय २२), अर्जुन मुकेश सिसोदिया (२०, दोघे रा. कडिया, ता. पचोर, मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे आणखी इतर दोन साथीदार असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून दहा हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

Superintendent of Police Shrikant Dhivere, Sanjay Bamble, Anil Bagul etc. present during the interrogation along with the suspects who withdrew Rs 5 lakh from the Union Bank branch.
Dhule Crime News : मद्यपी पतीच्या मारहाणीत पत्नी ठार; सांगवी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com