Dhule News : धुळ्यात चांगले रस्ते खराब करण्याचा ‘उद्योग’! विविध भागात प्रकार

Dhule : शहरातील मालेगाव रोड भागातील छोरियानगर येथील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली.
Excavation done after good road at Chorianagar on Malegaon Road. In the second photo, an angry resident is giving a statement to Deputy Commissioner Shobha Baviskar.
Excavation done after good road at Chorianagar on Malegaon Road. In the second photo, an angry resident is giving a statement to Deputy Commissioner Shobha Baviskar.esakal

Dhule News : चांगल्या, पक्क्या रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने खोदकाम करून ठेकेदाराने रस्त्याची वाट लावली, असा संताप व्यक्त करत शहरातील मालेगाव रोड भागातील छोरियानगर येथील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली. शहरातील इतरही काही भागात नव्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदकामाचे प्रकार पाहायला मिळत आहेत. पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी अक्षरशः चिखल होतो. त्यामुळे नवा रस्ता गेला कुठे, असा प्रश्‍न पडतो. शहरासह हद्दवाढ क्षेत्रातील नागरिक रस्ते, गटारांसाठी लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाशी नेहमी झगडतात. ( Industry of destroying good roads in different areas )

यातील काही नागरिकांच्या अथक परिश्रमांना यश येऊन त्यांच्या भागात रस्ते, गटारांची कामे होतात. इतर बहुसंख्य नागरिकांच्या पदरी निराशाच असते. पावसाळ्यात रस्ते, गटारी नसल्याने अशा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे ज्या भागात नव्याने रस्ते झाले आहेत त्या रस्त्यांची वाट लावण्याचा प्रकार पाहायला मिळतो. रस्ते झाल्यानंतर गटारांची, जलवाहिनी टाकण्याची कामे काढली जातात, याशिवाय जलवाहिन्यांच्या गळत्या, व्हॉल्व्ह गळती अशा विविध कारणांनी नवेकोरे रस्ते खोदले जातात. असे प्रकार धुळे शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. (latest marathi news)

Excavation done after good road at Chorianagar on Malegaon Road. In the second photo, an angry resident is giving a statement to Deputy Commissioner Shobha Baviskar.
Dhule News : प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास मुहूर्त मिळेना; व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष यंदाही विस्कळित

मग खोदकाम कशासाठी?

रस्ते खोदल्याने त्या-त्या रस्त्यांवर पाऊस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चिखल होतो. त्यामुळे नव्या रस्त्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न पडतो. अशीच स्थिती मालेगाव रोडवरील छोरियानगर येथे पाहायला मिळत आहे. २५ जूनला ड्रेनेज लाइनचे काम करायचे आहे, असे सांगत ठेकेदाराने पक्क्या रस्त्यात खोदकाम केले. मात्र, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने खोदकाम करून ठेकेदाराने खोदकामाच्या ठिकाणी पाइप न टाकता खोदकाम केलेली चारी बुजविली.

त्यामुळे चांगल्या पक्क्या रस्त्याची वाट लागली, अशी तक्रार येथील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडे केली. ठेकेदाराने संबंधित रस्ता दुरुस्त करून द्यावा. तसेच महापालिकेच्या संबंधित अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र पाटील, ललित खळगे, सुनील अग्रवाल, श्री. कांकरिया, श्री. भांड यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. मागणीचे निवेदन उपायुक्त शोभा बाविस्कर यांना दिले.

Excavation done after good road at Chorianagar on Malegaon Road. In the second photo, an angry resident is giving a statement to Deputy Commissioner Shobha Baviskar.
Dhule News : कृषी विभागाच्या योजनांपासून बळीराजा‌ ‘वंचित’! रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांची फरपट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com