Jowar Crop
sakal
धुळे: जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी कणसावर अळी (Helicoverpa armigera) या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. हरभरा पिकावरील अळीची एक पिढी पूर्ण झाल्यानंतर ही अळी आता ज्वारीकडे वळली असून, यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच उपाययोजना करून नुकसान टाळावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.