Ladki Bahin Yojana : जिल्हास्तरीय संनियंत्रण कक्षाकडून अंमलबजावणी; विविध विभागांच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारीची निश्‍चिती

Dhule News : योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील मुली व महिलांना दरमहा पंधरा रुपयांचा लाभ थेट हस्तांतर पद्धतीने देण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal

Dhule News : महिला व मुलींचे आर्थिक-सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलैपासून लागू झाली आहे. या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहता कामा नये, तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तर, तालुकास्तर तसेच शहरी क्षेत्रासाठी नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य सचिव अभिनव गोयल यांनी आदेश निर्गमित केले. (dhule Ladki Bahin Yojana Implementation by District Level Coordination Unit)

योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील मुली व महिलांना दरमहा पंधरा रुपयांचा लाभ थेट हस्तांतर पद्धतीने देण्यात येणार आहे. त्यासाठी १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पात्र लाभार्थ्यांचे ऑनलाइन, ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

संनियंत्रण कक्ष स्थापन

निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे जिल्हास्तरीय संनियंत्रण कक्षाचे प्रमुख आहेत. पालिका प्रशासनाचे जिल्हा सहाय्यक आयुक्त, मनपा उपायुक्त, महसूलचे तहसीलदार, जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी कार्यालयातील लेखापाल कक्षात समाविष्ट आहेत.

कक्षाची जबाबदारी

कक्षामार्फत योजनेविषयक जिल्ह्यात देखरेख व संनियंत्रण करणे, योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित तालुकास्तरीय समितीच्या बैठका व आढावा घेणे, जिल्हास्तरीय समितीच्या बैठका, प्राप्त लाभार्थी याद्यांची तपासणी व पडताळणी, दैनंदिन प्राप्त अर्जांची संख्या, पात्र, अपात्र अर्ज संख्यांची दैनंदिन माहिती शासनास सादर करणे, तसेच पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करून जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांचे बँक खात्यावर लाभांचे डीबीटीद्वारे हस्तांतरण करणे, योजनेसाठी उपलब्ध आर्थिक तरतुदीसाठी राज्यस्तरीय समितीकडे मागणी नोंदणी तसेच योजनेच्या प्राप्त तक्रारीची तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करून तिचे निराकरण करण्याचे कार्य जिल्हास्तरीय कक्षामार्फत होईल. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Ladki bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ‘बहीण’ अधिकच ‘लाडकी’; दहा हजारांवर महिलांची नोंदणी पूर्ण

अर्जाबाबत सूचना

ग्रामीण क्षेत्रासाठी सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पदनिर्देशित बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), पदनिर्देशित संरक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी धुळे, नंदुरबार शहरी प्रकल्प) आदींचा समावेश आहे. कक्षामार्फत अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायतीकडून लाभार्थ्यांच्या अर्जाची स्वीकृती, तपासणी, पोर्टलवर अपलोड करणे तसेच ऑफलाइन अर्ज स्वीकारून ऑनलाइन अर्जाचे कामकाज करणे.

ग्रामस्तरावर प्राप्त होणाऱ्या अर्जाची माहिती ठेवणे, ऑफलाइन अर्ज ऑनलाइन करणे तसेच अर्जाची पडताळणी, तपासणी गावातील अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येईल. याबाबत ग्रामसेवकांची जबाबदारी राहील.

शहरासाठी आयुक्त बांधील

शहरी क्षेत्रासाठी मनपा आयुक्त नियंत्रण अधिकारी, शहर अपर तहसीलदार, पालिकेचे मुख्याधिकारी, शहरी व ग्रामीण बालविकास प्रकल्पांचा नागरी भागासाठी समावेश राहील. या कक्षामार्फत अंगणवाडीसेविका, मुख्य सेविकांकडून तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे प्राप्त लाभार्थ्यांच्या अर्जाची स्वीकृती, तपासणी, पोर्टलवर ऑनलाइन करण्याची जबाबदारी वॉर्ड ऑफिसर यांची राहील. प्राप्त अर्ज तीन दिवसांच्या आत पडताळणी, तपासणी करून घेणे शहरातील वॉर्ड अधिकाऱ्यांना बंधनकारक असेल. शहरातील वॉर्ड संख्येनुसार ५ ते १० वॉर्ड पर्यवेक्षण करण्याकामी एका समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करणे. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: अर्जासाठी अतिरिक्त तरुणांची मानधन तत्त्वावर नियुक्ती! बामखेडा ग्रामपंचायतीने महिलांची गैरसोय केली दूर

बँकेत खाते उघडावे

सहाय्यक आयुक्त समन्वय अधिकारी राहील. वॉर्डातील लोकसंख्या व अपेक्षित अर्जांची संख्या विचारात घेतली जाईल. वॉर्ड अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेले अर्ज तपासण्याची जबाबदारी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची (नागरी धुळे शहर) राहील. महिला लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी वॉर्डनिहाय विशेष शिबिर होतील. लाभार्थ्यांचे शून्य बँक खाते उघडणे, जुने बँक खाते सक्रिय करणे, आवश्यक तेथे आधारकार्ड लिंक करणे, नवीन व जुने बँक खाती ई-केवायसी करण्यासाठी सर्व बँक तसेच जिल्हा अग्रणी बँकेने दक्षता घ्यावी.

आपले सरकार सेवा केंद्राच्या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापकांनी महाईसेवा, संग्राम केंद्र सेतूचालकांनी लाभार्थ्यांच्या विविध प्रमाणपत्रांसाठी प्राप्त अर्जावर तातडीने कार्यवाही करून ते वरिष्ठ कार्यालयास पाठवावेत. ॲपबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी समन्वय करावे, असे निर्देश आहेत.

अर्जाची तीन दिवसांत पडताळणी

कक्षाकडे प्राप्त अर्ज तीन दिवसांच्या आत पडताळणी, तपासणी करून तालुकास्तरीय समितीकडे सादर करणे बंधनकारक असेल. तालुक्यातील १० ते १५ गावांचे पर्यवेक्षणासाठी एक समन्वय अधिकारी याचे नेमणूक करणे, समन्वय अधिकारी म्हणून संबंधित विस्ताराधिकारी, पंचायत समितीमधील अन्य अधिकारी यांची नेमणूक तालुकास्तरीय समितीने गावातील लोकसंख्या व अपेक्षित अर्जाची संख्या विचारात घेऊन नेमणूक करावी.

दैनदिन प्राप्त अर्जाची सुविधा केंद्रामार्फत डेटा एन्ट्री करून यादी तयार करावी व यादीचे दर शनिवारी वाचन करण्यात येऊन ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविकेच्या संयुक्त दिनांकित स्वाक्षरीने प्रसिद्ध करावी. यासाठी ग्रामस्तरावर विशेष शिबिराचे आयेाजन करावे. तालुक्यातील सर्व समन्वय अधिकाऱ्यांकडे ग्रामसेवकामार्फत तपासणीतून प्राप्त झालेले अर्ज तालुकास्तरीय समितीकडे सादर करण्याची जबाबदारी नामनिर्देशित महिला व बालविकास अधिकाऱ्यांची राहील.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ‘माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज मिशन मोडवर भरा; जिल्हाधिकारी प्रसाद यांचे गटविकासाधिकाऱ्यांना आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com