Dhule health award
sakal
धुळे: मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे झालेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात लामकानी (ता. धुळे) प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयास ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ आणि ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.