Dhule Assembly Constituency : काँग्रेसच्या नव्हे, तर भाजपच्या बाबांचाच करिश्मा

Assembly Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात अटीतटीची लढत झाली.
Dr. shobha bachhav 
Dr. Subhash Bhamre
Dr. shobha bachhav Dr. Subhash Bhamreesakal

Dhule Assembly Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटच्या षटकापर्यंत तथा शेवटच्या फेरीपर्यंत चढ-उतार झाले. डॉ. बच्छाव यांनी अंतिम फेरीत विजयश्री खेचून आणली. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाने पुन्हा एकदा डॉ. भामरे यांना तब्बल ६४ हजारांची आघाडी दिली. पण ही आघाडी त्यांचा पराभव टाळू शकली नाही. ( Subhash Bhamre and Congress Dr Shobha Bachhao had close fight )

धुळे ग्रामीणमध्ये आमदार कुणाल पाटील तथा बाबा असताना डॉ. सुभाष भामरे तथा बाबा यांचाच करिश्मा चालला. धुळे ग्रामीणमध्ये दुपारी डॉ. सुभाष भामरे विजयी झाल्याचे व्हायरल झाले अन् गावोगावी भाजपच्या गोटातून फटाक्यांची आतषबाजी झाली. सोशल मीडियावर श्रेय घेण्याच्या पोस्टही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या. विजयी झाल्यानंतर आम्हाला विसरू नका. आम्हीही विजयाचे शिल्पकार आहोत.

त्याचबरोबर डॉ. भामरे यांचे अभिनंदन करणारे पोस्टर्सही व्हायरल झालेत. पण चौदाव्या फेरीपासून पुन्हा नव्याने आकडेमोड सुरू झाल्याचे समजताच भाजपच्या गोटात शांतता पसरली अन् दीड तासानंतर डॉ. बच्छाव विजयी झाल्याचे कळताच काँग्रेस आघाडीच्या गोटातून अभूतपूर्व जल्लोष झाला. पुन्हा फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. आताही काँग्रेसच्या गोटाकडून होती.

प्रथमच विजेता आणि पराभूत उमेदवारांकडून फटाक्यांची आतषबाजी झाल्याचे व जल्लोष झाल्याचे पाहायला मिळाले.धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या डॉ. बच्छाव यांना ७६ हजार २६६ व भाजपचे डॉ. भामरे यांना एक लाख ४० हजार ५०५ एवढी मते मिळाली. डॉ. भामरे यांना तब्बल ६४ हजार २३३ ची आघाडी मिळाली. त्यांना ही आघाडी तारू शकली नाही. (latest marathi news)

Dr. shobha bachhav 
Dr. Subhash Bhamre
Nashik Assembly Constituency : मध्य विधानसभा मतदारसंघात धोक्याची घंटा! महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी

लोकसभेसाठी धुळे ग्रामीण भाजपचा, तर विधानसभेसाठी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. डॉ. भामरे यांना मिळालेली आघाडी खूपच मोठी आहे. ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील असताना त्यांचा करिश्मा चालू शकला नाही, अन्यथा डॉ. बच्छाव यांची विजयी आघाडी मोठी वाढू शकली असती.

ग्रामीणमध्ये दोन्ही बाबाच वरचढ

धुळे ग्रामीणमधील जनता ही सोयीचे राजकारण करीत आली आहे. आताही हे तेच चित्र पाहायला मिळाले. लोकसभेसाठी भाजप आणि विधानसभेसाठी काँग्रेसची बाजू वरचढ ठरत आहे. म्हणजे दोन्ही बाबा ग्रामीणमध्ये लोकप्रिय तथा वरचढ असल्याचे चर्चिले जात आहे.

मोठ्या गावांमध्ये भाजपच

धुळे ग्रामीणमधील कापडणे, सोनगीर, कुसुंबा, लामकानी, मुकटी, नेर, फागणे, आर्वी व बाळापूर या मोठ्या गावांचा करिश्मा इतर लहान गावांचे मतपरिवर्तन केल्याचे आढळून आले. मोठ्या गावांमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळून आली आहे. आता यापुढील काळात काँग्रेसला मोठ्या गावांकडे लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा काँग्रेसची गणिते चुकत जातील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मते

डॉ. शोभा बच्छाव : ७६,२६६

डॉ. सुभाष भामरे : १,४०,५०५५

Dr. shobha bachhav 
Dr. Subhash Bhamre
Raver Assembly Constituency : भाजपचे संघटन, मोदी सरकारच्या कामांचा प्रभाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com