Dhule Lok Sabha Constituency : MIMची खेळी फलदायी ठरणार? काँग्रेसला साथ; साडेतीन लाखांवर मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Lok Sabha Election 2024 : भाजप विरोधातील ही खेळी खेळताना या पक्षाचे धुळे शहर, मालेगाव येथील दोन आमदार प्रतिस्पर्धी काँग्रेसला किती मते मिळवून देऊ शकतात? त्यावर या पक्षाच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असेल.
MIM
MIMesakal

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात यंदा होणारी निवडणूक भाजपला सोपी आणि एकतर्फी राहिल, असा सुरवातीला विविध पातळीवरचा अनुमान होता. तो एमआयएम, वंचित बहुजन आघाडी रिंगणात नसल्यामुळे बिघडला. `एमआयएम`ने काँग्रेसला साथ देत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. भाजप विरोधातील ही खेळी खेळताना या पक्षाचे धुळे शहर, मालेगाव येथील दोन आमदार प्रतिस्पर्धी काँग्रेसला किती मते मिळवून देऊ शकतात? त्यावर या पक्षाच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असेल. (Dhule Lok Sabha Constituency Will MIM move profitable news)

मालेगाव मध्य (शहर), धुळे शहर सर्वाधिक मुस्लीमबहुल आहे. या खालोखाल दोंडाईचा, नरडाणा, सोनगीर व मतदारसंघातील इतर भागातही कमी- अधिक प्रमाणात मुस्लीम मतदार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या सरासरी ३ लाख ७२ हजार आहे. यात मालेगाव मध्य मतदारसंघात २ लाख ८० हजार, तर धुळे शहरात ८० हजार मतदार आहेत. उर्वरित मतदार विखुरलेले आहेत. देशात एकमेव धुळे लोकसभा मतदारसंघात `एमआयएम`चे दोन आमदार आहेत.

मुस्लीम समाजाची बैठक

एमआयएम पक्ष भाजपला छुपी मदत करत असतो, असा आरोप विविध पातळ्यांवर राहिलेला आहे. त्याचे `एमआयएम`ने वेळोवेळी खंडन केले. आता वंचित बहुजन आघाडी भाजपला छुपी मदत करत असल्याचा आरोप होताना दिसतो. त्याचे आघाडीचे नेते खंडन करत असतात.

अशा घडामोडीत `एमआयएम`ने धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच धक्का दिला. धुळ्याचे आमदार फारूक शाह यांनी येथील मुस्लीम समाजातील धर्मगुरू, लोकसेवक, प्रतिष्ठीतांसह कार्यकर्त्यांची बैठक बोलावत सर्वानुमते `एमआयएम`चा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.

उमेदवार न देण्याचे ठरले

मालेगाव येथे मौलाना उमरेन यांनी `एमआयएम`तर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केली. तेथे या पक्षाच्या आमदारांसह इतर मान्यवरांनी मौलानांची समजूत काढली. त्यामुळे त्यांनीही उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला. धुळे शहर, मालेगाव मध्य मतदारसंघात आमदारांसह धर्मगुरू, कार्यकर्ते, प्रतिष्ठीत व लोकसेवकांनी `एमआयएम`चा उमेदवार न देता मत विभाजन टाळून काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला.

त्यात काँग्रेसच्या व्यासपीठावर `एमआयएम`चा कुठलाही पदाधिकारी बसणार नाही, असेही ठरविण्यात आले. पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे आयपीएस उमेदवार अब्दुर रेहमान यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने मत विभाजनाचा प्रश्‍न बऱ्यापैकी निकालात निघाला. या घडामोडी काँग्रेससाठी फलदायी, तर भाजपसाठी चिंतेच्या ठरल्या आहेत. (Latest Marathi News)

MIM
Pariyanka Gandhi Nandurbar Sabha : भाजपच्या काळात अत्याचार, महागाई वाढली : प्रियांका गांधी

काँग्रेसच्या मतांची स्थिती

रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेणारे `एमआयएम`चे दोन आमदार काँग्रेसच्या पारड्यात किती मते टाकतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. २००९ च्या निवडणुकीत पराभूत काँग्रेसचे आमदार अमरिशभाई पटेल यांना मालेगाव मध्य मतदारसंघात ४६ हजार ८६ व धुळे शहरातून २५ हजार ८४३ मते, तसेच २०१४ च्या निवडणुकीत पराभूत काँग्रेसचे आमदार अमरिशभाई पटेल यांना मालेगाव मध्य मतदारसंघात १ लाख ३३ हजार ३४६, तर धुळे शहरातून ४९ हजार ४८७ मते, तसेच २०१९ च्या निवडणुकीत पराभूत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना मालेगाव मध्यला १ लाख २६ हजार २७३, तर धुळे शहरात ५७ हजार ४२३ मते मिळाली होती. या तीनही कालावधीतील निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मालेगाव मध्यला पाच हजारापेक्षा अधिक मते मिळालेली नाहीत.

७५ टक्के मतांवर लक्ष

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मालेगाव मध्य आणि धुळे शहरातील मुस्लीम समाजाच्या एकगठ्ठा मतांवर डोळा असेल. यात मुस्लीम समाजाच्या सरासरी ३ लाख ७२ हजार मतांपैकी किमान ७५ ते ८० टक्के मते कशी पदरात पाडून घेता येतील यावरच काँग्रेसचा अधिक भर असेल. असे असताना `एमआयएम`ची कशी मदत काँग्रेसला लाभते यावर उमेदवाराच्या विजयाचे भवितव्य अवलंबून असेल.

ही स्थिती भाजपसाठी अडचणीची असेल. वर्षभरापासून धुळे शहरात भाजपने हिंदुत्वावर अधिक जोर देत मते एकवटून घेण्याची रणनीती अंमलात आणली आहे. त्यानुसार `एमआयएम`ने त्यांची एकगठ्ठा मतांची रणनीती स्वीकारली. या घडामोडीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशा सरळ लढतीत कमालीची चुरस वाढत चालली आहे.

MIM
Priyanka Gandhi : भाजपची विचारधारा आदिवासींविरोधी : प्रियांका गांधी; पंतप्रधान मणिपुरातील आदिवासींवरील अत्याचारावर का बोलत नाहीत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com