Dhule Lok Sabha Election : मतदारांच्या गृहभेटीसाठी 19 पथके नियुक्त; टक्केवारी वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाकडून कार्यवाही

Lok Sabha Election : धुळे महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या क्षेत्रात मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पथके नियुक्ती केली आहेत.
Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency esakal

Dhule Lok Sabha Election : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाकडून धुळे महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या क्षेत्रात मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पथके नियुक्ती केली आहेत. मनपा क्षेत्रातील १९ प्रभागांसाठी १९ पथके असून, या पथकांवर नियंत्रणासाठी नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती झाली आहे. ( 19 team appointed for home visits of voters)

गृहभेटीसाठी नियुक्त एका पथकाला किमान ३०० कुटुंबांना भेटीचे उद्दिष्ट आहे. १३ ते २० मेदरम्यान पथकांनी हे काम करायचे आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मागील निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांच्या क्षेत्रात घरोघरी भेट देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

गृहभेटीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) सोबत आरोग्यसेवक, अंगणवाडीसेविका, महिला बचतगट, सहकारी संस्था व कर्मचारी यांचा गट तयार करून एका मतदान केंद्रावर अंदाजे एक हजार २०० मतदार गृहीत धरून तीन ते चार जणांची टीम तयार करून एका टीमला किमान ३०० कुटुंबांच्या भेटीचे उद्दिष्ट देण्याबाबत सूचना आहेत. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने धुळे शहरात प्रभागनिहाय नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी तसेच पथकांची नियुक्ती केली आहे. (latest marathi news)

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Election : डॉक्टरांचाही आता राजकीय दबावगट!

महापालिकेकडून नियुक्त पथकात स्वच्छता निरीक्षकांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे, तर त्यांच्या पथकात त्या-त्या प्रभागातील सर्व मुकादम व सफाई कामगारांचा समावेश केला आहे. या पथकांनी बीएलओ यांच्यासोबत प्रभागातील प्रत्येक घरी भेट देऊन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करायचे आहे. एका टीमला किमान ३०० कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

पथकातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या जबाबदारीची काटेकोर अंमलबजावणी करावी, संबंधित काम राष्ट्रीय काम असल्याने हलगर्जी करू नये, जबाबदारी पार पाडताना कुठल्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असा आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे.

अधिकाऱ्यांची नियुक्ती

नोडल अधिकारी असे ः उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर (प्रभाग १ ते १०), उपायुक्त हेमंत निकम (प्रभाग ११ ते १९)

सहाय्यक नोडल अधिकारी असे ः अधीक्षक मधुकर निकुंभे (प्रभाग १ ते ५), अधीक्षक कैलास लहामगे (प्रभाग ६ ते १०), अधीक्षक किशोर सुडके (प्रभाग ११ ते १५), अधीक्षक शिरीष जाधव (प्रभाग १६ ते १९).

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Election : साडेसात हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात; जिल्हा अधीक्षक श्रीकांत धिवरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com