Dhule Lok Sabha Election : काँग्रेसने तब्बल 80 वेळा घटना तोडली; नितीन गडकरींचा आरोप

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष संविधान बदलण्यासाठी ‘अब की बार चारशे पार’ जागा मागत असल्याचा आरोप करीत आहे.
Candidate of Mahayutti in Lok Sabha election Dr. Union Minister Nitin Gadkari speaking at a meeting held on Friday for the campaign of Subhash Bhamre.
Candidate of Mahayutti in Lok Sabha election Dr. Union Minister Nitin Gadkari speaking at a meeting held on Friday for the campaign of Subhash Bhamre.esakal

Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष संविधान बदलण्यासाठी ‘अब की बार चारशे पार’ जागा मागत असल्याचा आरोप करीत आहे. वास्तविक देशातील घटनेचे मूलभूत तत्त्व कुणीही बदलू शकत नाही, असा चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या सात न्यायमूर्तींचा निर्णय आहे. याउलट काँग्रेसनेच ८० वेळा घटना तोडण्याचे काम केल्याचा प्रत्यारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदखेड्यातील प्रचार सभेत शुक्रवारी (ता. १७) केला. ( Nitin Gadkari allegations of Congress violated constitution as many as 80 times )

धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ किसान हायस्कूलचा पटांगणावर सभा शुक्रवारी (ता. १७) झाली. त्या वेळी ते बोलत होते. श्री. गडकरी म्हणाले, की काँग्रेसच्या नाऱ्याप्रमाणे गरिबी हटली का? उलट ‘एक पाव गटाव, गरिबी हटाव’ असा काँग्रेस नेत्यांचा नारा होता. समाजातील जातीयवाद संपला पाहिजे. काँग्रेसने ६० वर्षांत जे केले नाही ते आम्ही दहा वर्षांत केले. महाराष्ट्राला १८ हजार कोटींचा निधी सिंचनासाठी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक कोटी ९४ लाख लोकांना आरोग्याची गॅरंटी दिली. देशात पाच हजार सहाशे किलोमीटरचे रस्ते बनवले. ४५ योजनांची यादी वाचली, तर काँग्रेसने सत्तर वर्षांत जेवढी कामे केली नाहीत, तेवढी कामे मोदींनी दहा वर्षांत केली. मोदी सरकारने देशाला सात नवीन आयटी कॉलेज दिले. मला नऊ डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. पैकी पाच या कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. देशात पाण्याची कमतरता नाही. (latest marathi news)

Candidate of Mahayutti in Lok Sabha election Dr. Union Minister Nitin Gadkari speaking at a meeting held on Friday for the campaign of Subhash Bhamre.
Dhule Lok Sabha Election : साडेसात हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात; जिल्हा अधीक्षक श्रीकांत धिवरे

ते अधिकाधिक जिरविण्याची गरज आहे, असेही श्री. गडकरी म्हणाले. आमदार जयकुमार रावल म्हणाले, की ही निवडणूक देशहितासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजेत. उमेदवार डॉ. सुभाष भामरे म्हणाले, की धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेने दोनवेळा मला आशीर्वाद दिले. तिसऱ्यांदाही द्यावेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की पाणीदार खासदार डॉ. सुभाष भामरे यांना निवडून द्या.

भाजपचे पक्ष निरीक्षक खासदार डॉ. अजित गोपचिडे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, आमदार काशीराम पावरा, डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, शिंदखेडा पंचायत समिती सभापती छाया गिरासे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे, संजीवनी सिसोदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, महावीरसिंह रावल, नारायण पाटील, राजेंद्र देसले, डी. आर. पाटील, अनिल वानखेडे, रजनी वानखेडे, कामराज निकम, वीरेद्रसिंह गिरासे, दीपक बागल आदी उपस्थित होते. डी. एस. गिरासे यांनी प्रास्ताविक केले.

Candidate of Mahayutti in Lok Sabha election Dr. Union Minister Nitin Gadkari speaking at a meeting held on Friday for the campaign of Subhash Bhamre.
Dhule Lok Sabha Election : शेतकरी, तरुण, महिलांचे प्रश्‍न केंद्रस्थानी : डॉ. शोभा बच्छाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com