Dhule News : शब्द-सुरांच्या भावमैफलीने आज समारोप; महासंस्कृती महोत्सव

Dhule : शासकीय सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनातर्फे येथील पोलिस कवायत मैदानावर २६ फेब्रुवारीपासून पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव सुरू झाला.
Nataraj Kalapathak presenting Maharashtra Darshan programme. In second photo, students watching an exhibition of paintings by Rajendra Sonar.
Nataraj Kalapathak presenting Maharashtra Darshan programme. In second photo, students watching an exhibition of paintings by Rajendra Sonar.esakal

Dhule News : महासंस्कृती महोत्सवात विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच शिवकालीन शस्त्र, पुस्तक, चित्रकला आणि व्यंग्यचित्र प्रदर्शन, आदिवासी संस्कृती प्रदर्शन, वस्त्र दालन, वन्यजीव फोटोग्राफी प्रदर्शनासह महिला बचतगटांचे स्टॉल लक्षवेधी ठरले आहेत.

या दालनांना धुळेकरांसह शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. २९) भेट दिली. महासंस्कृती महोत्सवाचा शुक्रवारी (ता. १) समारोप होईल. (Dhule Mahasanskruti Mahotsav concludes today with concert)

शासकीय सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनातर्फे येथील पोलिस कवायत मैदानावर २६ फेब्रुवारीपासून पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव सुरू झाला. महोत्सवात तीन दिवसांपासून आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचा आस्वाद धुळेकरांनी घेतला.

विविध प्रदर्शनांना भेट

महासंस्कृती महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, वस्त्र दालन, आदिवासी संस्कृती प्रदर्शन, वन्यजीव फोटोग्राफी प्रदर्शनासह महिला बचतगटांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

अमळनेर (जि. जळगाव) येथील स्पार्क फाउंडेशनने गेल्या २५ वर्षांच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रासह देशाच्या कान्याकोपऱ्यात भटकंती व संग्रह करून दुर्मिळ पुरातन शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन मांडले आहे. यात दांडपट्टा, चिलखत, वाघनखे, भाले, कट्यार, कुऱ्हाडी, बिछवे, छुरे, ढाली, कुलपे अशा अनेक विविध प्रकारच्या शस्त्रांचा ऐतिहासिक ठेवा समाविष्ट आहे.

चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद

अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या पत्नी वैशाली काळे यांचे चित्रप्रदर्शन आकर्षण ठरत आहे. यातील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र सर्वाधिक आकर्षक ठरले आहे. व्यंग्यचित्रकार राजेंद्र सोनार यांचे व्यंग्यचित्र, हास्यव्यंग, बॉलपेन, पेटिंग, फोटो, कॅमिग्राफी चित्रप्रदर्शन, तर खानदेश फाइन आर्ट सोसायटीचे आर्ट पेंटिंग प्रदर्शन, आदिवासी संस्कृती दालन, साहित्यरत्न दालन, महाराष्ट्र राजवस्त्र (पैठणी) व संस्कृती प्रदर्शन, नॅशनल वाइल्ड लाइफ चित्रप्रदर्शन या महोत्सावाचे आकर्षण ठरत आहे. (latest marathi news)

Nataraj Kalapathak presenting Maharashtra Darshan programme. In second photo, students watching an exhibition of paintings by Rajendra Sonar.
Dhule News : शिंदखेडा तालुक्याला 86 कोटी : आमदार रावल

मलखांब प्रात्यक्षिक

महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सकाळी झालेल्या कार्यक्रमात राजेंद्र पवार व सहकारी (साक्री) यांचे जगणं तुमचं आमचं, कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुजय भालेराव लिखित विधी (बालनाट्य).

जोधराज रामलाल हायस्कूल व द. मा. बारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मलखांब प्रात्यक्षिक, तसेच नारायण खताळ यांच्या श्रमिक बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या नटराज कलापथकाने महाराष्ट्र दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कविसंमेलन, शब्दसुरांची यात्रा

पोलिस कवायत मैदानावर शुक्रवारी (ता. १) सकाळी दहाला तऱ्हाडी (ता. शिरपूर) येथील महात्मा फुले कृषक मंडळ व बहुउद्देशीय संस्थेतर्फे शाहिरी जलसा, सकाळी साडेदहाला कृष्णनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा बेलसर स्वारी, सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत कविसंमेलन.

सायंकाळी पाचला जळगाव येथील परिवर्तन संस्थेतर्फे अरे संसार संसार (संगीत व नाट्य), सायंकाळी सातला जिल्हा प्रशासनातर्फे समारोपाचा कार्यक्रम आणि सायंकाळी साडेसात ते रात्री दहापर्यंत मुंबई येथील भीमराव पांचाळ यांचा शब्दसुरांची भावयात्रा हा कार्यक्रम होईल. महोत्सवाचा शुक्रवारी समारोप असल्याने धुळेकरांसह विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट द्यावी, कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Nataraj Kalapathak presenting Maharashtra Darshan programme. In second photo, students watching an exhibition of paintings by Rajendra Sonar.
Dhule News : रस्ता काँक्रिटीकरणासाठी 424 कोटी; शिरपूर तालुक्याला लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com