Dhule Municipal Corporation
sakal
धुळे: महापालिकेच्या राजकीय आखाड्यात ५० जागांचे स्पष्ट बहुमत मिळवून भारतीय जनता पक्षाने आपली ताकद सिद्ध केली आहे. मात्र, विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे महापौर निवडीचा खऱ्या अर्थाने पेच निर्माण झाला असून, पक्षातच ‘त्रिकोणी संघर्ष’ पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत तीन दिग्गज महिला सदस्यांची नावे चर्चेत असून, त्यांच्या आडून बड्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.