ZP Marathi School
ZP Marathi Schoolesakal

Dhule ZP School: जिल्हा परिषदेच्या एकाच आवारात भरणाऱ्या शाळा विलीन! जिल्ह्यातील 15 शाळा; तूर्त आठच शाळांचे एकत्रीकरण

Dhule News : केवळ आठच गावांतील शाळांच्या एकत्रीकरणाचा फतवा निघाला आहे. त्यातही केवळ तीनच गावांतील शाळा एकत्रीकरण झाल्या आहेत.
Published on

कापडणे : जिल्ह्यातील पंधरा गावांमध्ये दोन दोन शाळा एकाच आवारात भरतात. या शाळांचे एकाच शाळेत रूपांतर करण्याच्या ठरावास मार्चमध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर केवळ आठच गावांतील शाळांच्या एकत्रीकरणाचा फतवा निघाला आहे. त्यातही केवळ तीनच गावांतील शाळा एकत्रीकरण झाल्या आहेत. (Dhule Merge schools in one premises of ZP)

या पंधरा गावांतील शाळा एकत्रित

जिल्ह्यातील अवधान, मोघण, शिरूड, मोहाडी, सोनगीर, बोरीस, नेर, कापडणे, शिंदखेडा, मालपूर, चिमठाणे, रुदावली, वर्षी, वारूड व नरडाणा या पंधरा गावांतील जिल्हा परिषदेच्या एकाच आवारात भरणाऱ्या दोन शाळांचे रूपांतर एकाच शाळेत एकत्रीकरणाचा ठराव मार्च २०२४ मध्ये झालेला आहे.

आठ गावांतील शाळा एकत्रीकरणाचा फतवा

१ मे २०२४ ला अवधान, मोघण, नेर, शिरूड, मोहाडी प्र. डांगरी, कापडणे, सोनगीर व बोरीस या आठ गावांतीलच शाळा एकत्रीकरणाचा फतवा निघाला आहे.

प्रत्यक्षात तीनच शाळा एकत्रीकरण

मेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी पंधरा गावांऐवजी आठ गावांतील शाळा एकत्रीकरणाचे लेखी आदेश काढलेले आहेत. यात अवधान येथील शाळा क्रमांक एक व दोन, मोघण येथील शाळा क्रमांक एक व दोन, मोहाडी येथील शाळा क्रमांक एक व दोन, नेर येथील शाळा क्रमांक एक व चार, शिरूड येथील मुले व कन्या शाळा, मोहाडी व बोरीस येथील शाळा क्रमांक एक व दोन, कापडणे येथील शाळा क्रमांक एक व दोन आणि सोनगीर येथील शाळा क्रमांक एक व तीन या शाळांचा समावेश आहे. (latest marathi news)

ZP Marathi School
Sangli Politics : 'मला टोकाला जायला लावू नका..'; जयंत पाटील समर्थकांची रील्स, खासदार अन् आमदार कदमांना इशारा

प्रत्यक्षात तीन गावांतील शाळांना तोंडी आदेश

जिल्ह्यातील तीस शाळांचे जुन्या शाळेत एकत्रीकरणाचा जिल्हा परिषदेत ठराव झाला. त्यानंतर आठ शाळांचे आदेश निघाले. आता शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांच्या माध्यमातून केवळ तीनच गावांतील शाळा एकत्रीकरणाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. यात कापडणे, सोनगीर व नेर येथील शाळांचा समावेश आहे.

रेकॉर्ड एकत्रीकरण

शाळा एकत्रीकरण करून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विलीनीकरण शाळेतील सर्व अभिलेखे, रेकॉर्ड, शाळेतील सर्व स्टॉक, साहित्य, रजिस्टर, इमारत आदी शाळा क्रमांक एकच्या मुख्याध्यापकांकडे हस्तांतर करण्यात येणार आहे.

ZP Marathi School
राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! राज्यातील प्रत्येकालाच आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; योजनेतील 1900 रूग्णालयांची यादी ‘येथे’ पहा एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com