धुळे- जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शुक्रवारी (ता. २५) विविध विरोधी पक्षांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेना (उबाठा) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री कोकाटे हे मुक्कामी असलेल्या धुळ्यातील महामार्गावरील हॉटेलबाहेर काळे झेंडे व पत्त्यांच्या माळा घेऊन निदर्शने केली. ‘चले जाओ-चले जाओ’, अशी जोरदार घोषणाबाजी करत मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.