Dhule Seed News : कापूस बियाणे सर्रास जादा दराने विक्री; आमदार रावलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Dhule Seed : सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कृषी विभागावर नियंत्रण राहिलेले नाही.
Cotton Seeds
Cotton SeedsSakal

Dhule Seed News : सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कृषी विभागावर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी कृषी विभागाच्या बेपर्वाईमुळे ८५० रुपयांना मिळणारी कापूस बियाणाची बॅग १२०० ते १३०० रुपयाला मिळत आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (complaint to District Collector for sale of cotton seeds at exorbitant rates )

आमदार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की धुळे जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. यात अनेक शेतकरी मेमध्येच कापूस लागवड करतात. यंदा अनेक कंपनीचे बियाणे निश्चित केलेल्या दराऐवजी जादा दराने मिळत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडून रोज प्राप्त होत आहेत. यात कंपनी, वितरक व दुकानदार यांचा काळाबाजार सुरू असून तब्बल सात कंपन्यांच्या बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याच्याही तक्रारी आहेत.

Cotton Seeds
Nandurbar Fake Seed Business: बोगस विक्रेत्यांविरुद्ध ठोस पावले उचलावीत; तणनाशकाची फवारणी केल्यास शेतीचा पोत खराब

यंदा आचारसंहिता असल्याने खरीप हंगाम आढावा बैठकीस लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता आले नाही. मात्र, आचारसंहिता असली तरी शेती व शेतकरी यांना प्रथम प्राधान्य देऊन नियोजन करणे महत्त्वाचे होते. कृषी विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसून ठरवून हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी म्हटले आहे. कापूस बियाणेच नव्हते तर १६ मेपासून विक्री का सुरू केली व शेतकऱ्यांना वेठीस का धरले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कठोर कारवाई करा

८६४ रुपयांचे बियाणे पाकीट १२०० ते १३०० रुपयांना विक्री होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे याप्रश्‍नी तत्काळ बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्यवेळी व निश्चित दरात बियाणे मिळेल, यासाठी उपाययोजना करावी, अधिक दराने विक्री करणारे वितरक व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार रावल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Cotton Seeds
Dhule Bogus Seed Sale : गुजरातमधून संशयित कापूस बियाणे धुळ्यात; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com