धुळे- देवपूरवगळता शहरातील मध्यवर्ती भागात शनिवारी (ता. ७) दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मोसमी पावसाने सरकारी यंत्रणेला कामाला लावले. केवळ पाच मिनीटे झालेल्या पावसासह वादळी वाऱ्याने वीज कंपनीचे नियोजन (?) उघडे पाडले. दुपारी ३.३५ नंतर वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर तो रात्री साडेदहापर्यंत सुरळीत झालेला नव्हता. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने तारा तुटल्या. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वीजपुरवठा खंडित झाला.