.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Dhule Monsoon : शिंदखेडा व साक्री तालुक्याची जीवनदायनी म्हणून बुराई नदी समजली जाते. बुराई नदीवर फोफदे (ता. साक्री) गावशिवारात बुराई मध्यम प्रकल्प असून, तो ९९.९३ टक्के भरल्याने ‘ओव्हरफुल’ झाल्याने त्याचा विसर्ग शेवाडे (ता. शिंदखेडा) गावशिवारातील वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्पात येत असून, ते २७.६० टक्के एवढे भरत आहे. बुराई नदीच्या उगमस्थानी मुसळधार पाऊस झाल्यास ते लवकर भरले जाईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. (Wadi Shewadi dam Medium Project file 27 percent)