धुळे : विकासात्मक कामासाठी धुळे महापालिका तब्बल ३५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित विकासात्मक कर्जाच्या अनुषंगाने धुळे महापालिका प्रशासनाने पहिले पाऊल उचलले असून, यात महापालिकेचे क्रेडिट रेटिंग करून घेण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा ठराव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.