Dhule Municipal Corporation
sakal
धुळे: ‘शासनाच्या माझी वसुंधरा अभियान-५.०’मध्ये तीन ते दहा लाख लोकसंख्या गटात धुळे महापालिकेने राज्यात द्वितीय, तर या अभियानातील भूमी या घटकांत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या जोरावर धुळे महापालिकेला तब्बल आठ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले, हे विशेष. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते महापालिकेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी मुंबईत ‘माझी वसुंधरा अभियान-५.०’ व ‘माझी वसुंधरा अभियान-४.०’ चे पारितोषिक स्वीकारले.