Dhule Municipal Corporation : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट! ४८ कोटींच्या पाणीपट्टीपैकी केवळ ५ कोटीच वसूल; ४३ कोटी अद्याप बाकी

Dhule Municipal Corporation Struggles to Recover Property Tax Dues : पाणीपट्टीपोटी ४८ कोटींपैकी आत्तापर्यंत केवळ पाच कोटी १९ लाख रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे अद्यापही तब्बल ४३ कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
Dhule Municipal Corporation

Dhule Municipal Corporation

sakal

Updated on

धुळे: मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेकडून प्रयत्न होत असले तरी मालमत्ता करापोटी १०० कोटींवर येणे बाकी आहे. तशीच स्थिती पाणीपट्टी वसुलीची आहे. पाणीपट्टीपोटी ४८ कोटींपैकी आत्तापर्यंत केवळ पाच कोटी १९ लाख रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे अद्यापही तब्बल ४३ कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेपुढे आहे. अर्थात, दर वर्षी अशीच स्थिती कायम राहते. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com